घरताज्या घडामोडीट्विटरच्या 'Blue Tick'साठी प्रत्येक देशात असतील वेगवेगळे दर

ट्विटरच्या ‘Blue Tick’साठी प्रत्येक देशात असतील वेगवेगळे दर

Subscribe

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यामधील सर्वाधिक मोठा म्हणजे ‘Blue Tick’ सबस्क्रिप्शन. कारण आता ‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यामधील सर्वाधिक मोठा म्हणजे ‘Blue Tick’ सबस्क्रिप्शन. कारण आता ‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यानुसार दर महिना 8 डॉलर म्हणजचे जवळपास 660 रुपये वसूल केले जाणार आहेत. मात्र, सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार असल्याने युझर्समध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क यांनी पुन्हा नवी घोषणा केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक देशात ट्विटरच्या ‘Blue Tick’साठी वेगवेगळे दर असणार आहेत. (Elon Musk Will Charge 8 Dollar Per Month For Twitter Blue Tick)

एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विटरच्या ‘Blue Tick’साठीच्या दरांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, “देशात ट्विटर ‘Blue Tick’चा चार्ज वेगवेगळा असणार आहे. कोणत्या देशात किती चार्ज वसूल करायचा आहे हे खरेदी पॉवरवर अवलंबून असेल. भारतात ट्विटर ब्लू टिकसाठी 660 रुपये मंथली चार्ज द्यावा लागणार आहे”, असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

एलॉन मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, ट्विटर प्लॅटफॉर्मला फ्री चालवले जाणार नाही. ट्विटर ‘Blue Tick’साठी दर महिना 8 डॉलर म्हणजचे जवळपास 660 रुपये वसूल केले जाणार आहेत. तसेच, ट्विटर ‘Blue Tick’ देण्याची सध्याची सिस्टम व्यवस्थित नाही, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, “पेड ब्लू टिक यूजर्सला रिप्लाय, सर्च आणि मेंशन मध्ये प्राथमिकता दिली जाईल. याशिवाय, ट्विटरवर मोठे व्हिडिओ आणि ऑडियो पोस्ट केले जावू शकतील. ट्विटर ‘Blue Tick’ यूजर्सला आधीच्या तुलनेत कमी जाहिराती दिसतील”, असेही एलॉन मस्क यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – राजस्थानमधील बंडखोर आमदारांवर कारवाई करा, सचिन पायलट यांची खर्गेंकडे मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -