घरमहाराष्ट्रताकद सगळ्यांमध्येच असते, सगळेच मजबूत असतात; बच्चू कडूंचा राणांना सूचक इशारा

ताकद सगळ्यांमध्येच असते, सगळेच मजबूत असतात; बच्चू कडूंचा राणांना सूचक इशारा

Subscribe

''ये पब्लिक सब जानती है, जनतेसमोर संपूर्ण पिक्चर ओपन आहे. जनतेला सगळे माहित आहे त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही''. असंही बच्चू कडू म्हणाले.

आमदार रवी राणा (ravi rana) आणि माजी मंत्री बच्चू कडू (bachhu kadu) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांना भेटण्यासाठी बोलवले होते. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करून सुद्धा राणा आणि कडू यांच्यातील वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही. आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याने या दोघांमधील वाद आणखीच चिघळण्याची शक्यता दिसते आहे.

याच संदर्भांत माजी मंत्री बच्चू कडू प्रतिक्रिया देत म्हणाले, ”मी तो विषय वाढवू इच्छित नाही. या सर्व प्रकारणानंतर तुम्ही या व्यक्तिगत वादात पडू नका विकासाकडे लक्ष द्या असे सांगणारेही फोन मला” असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान राणा आणि कडू यांच्या वादानंतर बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झलेले पाहायला मिळाले.

- Advertisement -

अशातच रवी राणा (ravi rana )यांनी पुन्हा जे वक्तव्य केले त्यावरूनही कडू यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली त्यावर बच्चू कडू म्हणले. ”मी माझ्या कार्यकर्त्यांना शांत राहायला सांगिलते आहे. आणि या वादावर आपली ऊर्जा वाया घालवू नका. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा चार पावले मागे येऊन जोमाने सामोरे जाऊ आणि हीच ऊर्जा आपण चांगल्या कामात लावू” असं आवाहन बच्चू कडू (bachhu kadu ) यांनी त्यांच्या कार्यकर्तांना केले.

मी उद्धव ठाकरेंचा दम खल्ल्ला नाही तर बच्चू कडू क्या चीज है असं वक्तव्य सुद्धा राणा यांनी केले होते त्यावरच प्रतिक्रिया देत कडू म्हणाले ”सगळ्यांमध्येच ताकद असते, सगळेच मजबूत असतात” ”मला वाद वाढवायचा नाही. हा विषय इथेच थांबवायचा आहे. त्यामुळे या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही”. असंही कडू म्हणाले.

- Advertisement -

आधी दिलगिरी मग चिथावणीखोर वक्तव्य

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी केल्या नंतर राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. आणि पुन्हा चिथावणीखोर वक्तव्य केले यावर बोलताना कडू म्हणाले. ”ये पब्लिक सब जानती है, जनतेसमोर संपूर्ण पिक्चर ओपन आहे. जनतेला सगळे माहित आहे त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही”. असंही बच्चू कडू म्हणाले.


हे ही वाचा – ये पब्लिक है सब जानती है; गुलाबराव पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन अंधारेंचा भाजपावर निशाणा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -