घरदेश-विदेशटार्गेट पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांना दिली "अशी" शिक्षा

टार्गेट पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांना दिली “अशी” शिक्षा

Subscribe

चीनमध्ये एका खाजगी कंपनीचे वर्षभराचे टार्गेट पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांना शिक्षा दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना गुडघ्यावर चालवून त्यांची धिंड गाढली आहे.

कंपनीचे वार्षीक टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे अनेकांना वरिष्ठांचे बोल ऐकावे लागतात. वार्षीक टार्गेट पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांना समज दिली जाते किंवा त्यांचे पगार कापण्यात येतात. मात्र चीन देशात एक वेगळ्याच पद्धतीने या कर्मचाऱ्यांना शिक्षा देण्यात आली आहे. चीनच्या एका कंपनीने टार्गेट पूर्ण न झाल्याने कपंनी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर गुडघ्यावरून चालवले आहे. ही धिंड भर गर्दीच्या रस्त्यावरून काढली गेली. त्यामुळे अनेकांना या कर्मचाऱ्यांकडे आश्चर्याने बघितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला यांनतर या कर्मचाऱ्यांना कंपनीत घेण्यात आले.

लोकांनी केला विरोध

पैशासाठी स्वतःचा आत्मसन्मान सोडून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून लोकांनी याचा विरोध केला आहे. ही शिक्षा म्हणजे मानवी अधिकारांचे उल्लंघन असल्याच्या कमेंट लोकांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -