घरदेश-विदेश२०१४ पासून २०२३ पर्यंत दर तीन महिन्याला काँग्रेसला धक्का, आतापर्यंत २५ नेत्यांनी...

२०१४ पासून २०२३ पर्यंत दर तीन महिन्याला काँग्रेसला धक्का, आतापर्यंत २५ नेत्यांनी सोडला पक्ष

Subscribe

२०१४ पासून सुरु झालेलं आऊटगोऊंग २०२३ मध्येही थांबलेलं नाही. गेल्या ९ वर्षांमध्ये जवळपास २५ जणांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. साधारण दर तीन महिन्यांनी एका नेत्याने काँग्रेसमधून काढता पाय घेतला आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु होईल अशी श्रेष्ठींना आपेक्षा होती, मात्र तसं चित्र अद्याप दिसलेलं नाही. उलट राहुल गांधी यांच्या लोकसभा सदस्यत्व निलंबनानंतर दोन नेत्यांनी पक्ष सोडला आहे. २०१४ पासून सुरु झालेलं आऊटगोऊंग २०२३ मध्येही थांबलेलं नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांचे चिरंजीव अनिल यांनी गुरुवारी पक्ष सोडला. तर दुसऱ्याच दिवशी दक्षिणेतील दुसरे नेते आणि माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी हायकमांडवर नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला आहे.

हायकमांडवर नाराजी व्यक्त करण्याची ही काही पहिली वेळ नाही. जी-२३ च्या निमित्ताने ही नाराजी उघड झालीच होती. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी पक्ष सोडला. राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अनेकांनी पक्ष सोडला आहे. गेल्या ९ वर्षांमध्ये जवळपास २५ जणांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. साधारण दर तीन महिन्यांनी एका नेत्याने काँग्रेसमधून काढता पाय घेतला आहे. यातील बहुतांश जण हे भाजपमध्ये गेले आहेत. मात्र यातील बहुसंख्य नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गुलाम नबी आझाद हे गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे नेतेही काँग्रेस सोडून गेले आहेत. त्यांनीही पक्ष सोडण्यासाठी हायकमांड जबाबदार असल्याचा आरोप केला.

- Advertisement -

या नेत्यांनी सोडला पक्ष 

१. किरण कुमार रेड्डी – २०२३ (भाजप)
२. अनिल अँटनी – २०२३ (भाजप)
३. कपिल सिब्बल – २०२२ जी-२३ मधील प्रमुख नेते.
४. गुलामनबी आझाद – २०२२ (स्वतंत्र पक्षाची स्थापना)
५. आरपीएन सिंह – २०२२
६. अमरिंदर सिंग – २०२२ (भाजप)
७. जितिन प्रसाद – २०२१ (भाजप)
८. ज्योतिरादित्य सिंधिया – २०१९ (भाजप)
९. टॉम वडाक्कन – २०१९
१०. राधाकृष्ण विखे – २०१९ (भाजप)
११. अल्पेश ठाकोर – २०१८ (भाजप)
१२. हार्दिक पटेल – २०१८ (भाजप)
१३. अशोक चौधरी – २०१८
१४. नारायण राणे – २०१६ (भाजप)
१५. रिटा बहुगुणा जोशी – २०१६ (भाजप)
१६. विजय बहुगुणा – २०१६ (भाजप)
१७. विश्वजीत राणे – २०१७ (भाजप)
१८. एनडी तिवारी – २०१७ (भाजप)
१९. शंकर सिंह वाघेला – २०१७
२०. एस.एम. कृष्णा – २०१७ (भाजप)
२१. गिरीधर गमंग – २०१५
२२. हेमंत बिस्वा सरमा – २०१५ (भाजप)
२३. अजित जोगी – २०१५
२४. चौधरी बिरेंदर सिंग – २०१४ (भाजप)
२५. जगदंबिका पाल – २०१४ (भाजप)
२६. प्रियंका चतुर्वेदी -२०१९ (शिवसेना)
२७. रिपून बोरा – २०२२ (टीएमसी)
२८. सुष्मिता देव – २०२१ (टीएमसी)
२९. किर्ती आझाद – २०२१ (टीएमसी)
३०. ललितेश पति त्रिपाठी – २०२१ (टीएमसी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -