घरताज्या घडामोडीनोकरीची ऑफर देत तरुणीकडून लाखांची फसवणूक, अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

नोकरीची ऑफर देत तरुणीकडून लाखांची फसवणूक, अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

पार्टटाईम नोकरीची ऑफर देत विविध टास्कद्वारे गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन अज्ञात सायबर ठगाने एका ३० वर्षांच्या महिलेची सुमारे पावणेतीन लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध एमआयडीसी पोलिीसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ३० वर्षांची ही महिला अंधेरी येथे राहत असून ती आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामाला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत तिच्या मोबाईलवर एक संदेश आला होता. त्यात पार्टटाईमची नोकरी ऑफर देऊन तिला टास्क पूर्ण केल्यावर चांगले कमिशन मिळण्याची संधी असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यासाठी तिला ऍमेझॉनवर काही प्रोजेक्ट खरेदी करावे लागणार होते. त्या मॅसेजवर विश्‍वास ठेवून तिने नोकरीची ऑफर स्विकारली होती. त्यानंतर तिचे एक डिझीटल अकाऊंट बनविण्यात आले होते. त्यात तिचे कमिशनची रक्कम जमा होणार होती. ठरल्याप्रमाणे तिला विविध टास्क देण्यात आले होते. ते टास्क पूर्ण करण्यासाठी तिने काही रक्कमेची गुंतवणुक केली होती. त्यानंतर तिच्या खात्यात काही कमिशनची रक्कम जमा होत गेली.

- Advertisement -

काही दिवसांनी तिला जास्त गुंतवणुकीची ऑफर देताना जास्त कमिशनचे गाजर दाखविण्यात आले होते. अशा प्रकारे तिने विविध टास्कसाठी पावणेतीन लाख रुपये ट्रान्स्फर केले. यावेळी तिच्या खात्यात तिने गुंतवणुक केलेल्या रक्कमेसह व्याजाचे पावणेसात लाख रुपये जमा झाल्याचे दिसून आले. मात्र तिला ती रक्कम तिच्या बॅक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. त्यासाठी तिला पंधरा टक्के टॅक्स भरावे लागेल असे सांगण्यात आले.

मात्र ही रक्कम जमा करुनही तिला पैसे मिळाले नाही. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : काँग्रेसमधून आशिष देशमुखांचं निलंबन, कारणे दाखवा नोटीस बजावली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -