जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये रात्री उशिरापासून जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. ही चकमक अध्यापही सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

Exchange of fire underway between terrorists and security forces in Gopalpora area of Kulgam
जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये मध्यरात्रीपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. जवान आणि दहशतवादी यांच्यात अजूनही चकमक सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा मृतदेह जवानांच्या हाती लागला आहे. याशिवाय चकमक अजूनही सुरु आहे. ही चकमक कुलगामच्या गोपालपोरामध्ये सुरु आहे. या परिसरात अजूनही काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. याशिवाय दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.