घरदेश-विदेशकोरोनानंतरही सेक्सचा धोका कायम...त्यामुळे 'ही' काळजी नक्की घ्या‍!

कोरोनानंतरही सेक्सचा धोका कायम…त्यामुळे ‘ही’ काळजी नक्की घ्या‍!

Subscribe

कोरोना व्हायरसच्या आजारातून बरे झाल्यानंतर लोकांनी काही दिवस कोणतेही शारिरीक संबंध ठेवू नये

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पुरुषांच्या शुक्राणूद्वारे कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असते. अशा लोकांना लैंगिक संबंधाबद्दल जागरुक राहण्यास सांगितले जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर कोणामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली तर त्यांनी लैंगिक संबंध आवर्जून टाळावे. तसेच कोरोना आजारापासून बरे झाल्यानंतरही काही दिवस लैंगिक संबंधांपासून दूर रहावे, असे सांगण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसच्या आजारातून बरे झाल्यानंतर लोकांनी काही दिवस कोणतेही शारिरीक संबंध ठेवू नये. चीनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, असे समोर आले की, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या शुक्राणूंमध्ये कोरोनाचे विषाणू असू शकतात. दरम्यान कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमधील शुक्राणूंमध्ये कोरोना व्हायरसचे विषाणू देखील आढळतात, असे थायलंडच्या रोग नियंत्रण विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

- Advertisement -

कोरोनातून बरे झाल्यानंतर काही दिवस चुंबन घेण्यास टाळावे. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर कमीत कमी ३० दिवस लैंगिक संबंध टाळण्यास थायलंडच्या रोग नियंत्रण विभागाचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच कोरोना या आजारातून बरे झाल्यानंतरही काही लोक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जर कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना ३० दिवसांनंतर शारिरीक संबंध ठेवायचे असल्यास त्यांनी कंडोम वापरणे आवश्यक आहे, असे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

चीनमध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासात ३८ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी १५ रूग्णालयातच होते, तर २३ जण कोरोना या आजारापासून बरे झालेले होते. या अभ्यासामध्ये नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यावेळी या एकूण कोरोना रूग्णांपैकी ५ जणांच्या शुक्राणूंमध्ये कोरोना विषाणू आढळला. तर कोरोना आजारापासून बरे झालेल्या २ लोकांच्या शुक्राणूंमध्येही कोरोना विषाणू असल्याचे सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पुर्णपणे बरे झाल्यानंतर काही दिवस कोरोनाचा विषाणू शरीरात असतो, अशावेळी जर शारिरीक संबंध ठेवले तर कोरोनाचा फैलाव पसरू शकतो. जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासामध्ये संशोधक शिजी झांग यांनी असे सांगितले की, बरे झालेल्या रूग्णांमुळे हा विषाणू इतरांपर्यंत पसरण्याची शक्यता अधिक असते.


सावधान! सेक्स केल्यामुळे होतोय कोरोना…

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -