घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये शाळेत स्फोट; १२ विद्यार्थी जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये शाळेत स्फोट; १२ विद्यार्थी जखमी

Subscribe

जम्मू-काश्मीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शाळा रिकामी करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका शाळेमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामध्ये १० वीमध्ये शिकणारे १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जम्मू-काश्मीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शाळा रिकामी करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील ५ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील प्रायवेट स्कूलमध्ये वर्ग सुरु होते. या वर्गामध्ये नववी आणि दहावीचे विद्यार्थी बसले होते. अचानक स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये दहावीचे १२ विद्यार्थी जखमी झाले. या जखमी विद्यार्थ्यांना ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र ग्रेनेड हल्ला झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. स्फोटाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -