घरदेश-विदेश२९ एप्रिल रोजी जगाचा विनाश होणार! जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओचे सत्य

२९ एप्रिल रोजी जगाचा विनाश होणार! जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओचे सत्य

Subscribe

सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, लवकरच जगात मोठी आपत्ती येऊन २९ एप्रिलपर्यंत या जगाचा अंत होणार...

भारतासह जगातील सर्व देश सध्या चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसशी झुंज देत आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत खगोलशास्त्रीय घटना समजताच लोकं अजून बिथरले आहेत. सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, लवकरच जगात मोठी आपत्ती येऊन २९ एप्रिलपर्यंत या जगाचा अंत होणार…बरेच लोक अशा बातम्यांचे काही व्हिडीओही शेअर करत आहेत, मात्र कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष न देता या दाव्यांमध्ये कोणतेही सत्य नाही, असे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या हवाल्याने सोशल मीडियावर अफवांचेसंदेश पसरले जात आहेत. या संदेशात असा दावा करण्यात आला आहे की, २९ एप्रिल रोजी जगाचा विनाश होणार असून त्यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओही समर्थनार्थ पसरवले जात आहेत. एक व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यामध्ये एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओचे कॅप्शन ‘२९ एप्रिल रोजी जगाचा अंत’ असे देण्यात आले आहे.

- Advertisement -

म्हणून केला जातोय दावा…

वास्तविक, अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने नुकतीच एक अधिसूचना प्रसिद्ध केली होती, त्यानुसार २९ एप्रिल २०२० पर्यंत पृथ्वीवरुन एक विशाल लघुग्रह जाणार असून जो हिमालयाच्या अर्ध्या आकाराचा असेल. दरम्यान, काही सोशल मीडिया नेटकरी त्याबद्दल खोटे दावे करत अफवा पसरवत आहेत आणि बनावट बातम्यांना प्रोत्साहन देत आहेत.

हे आहे सत्य

नक्कीच, २९ एप्रिल २०२० पर्यंत पृथ्वीवरुन एक विशाल लघुग्रह निघून जाणार आहे. नासाच्या मते, १९९८ OR2 नावाचा एक लघुग्रह भूगर्भातून १.८ दशलक्ष किमी अंतरावर दूर जाणार आहे. हा लघुग्रह येत्या ५०० वर्षात पृथ्वी जवळ इतक्या जवळपास येणार आहे. परंतु यामुळे पृथ्वी पूर्णपणे सुरक्षित राहील. याला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र नासाने या संदर्भातील माहिती दिल्याने जगाचा अंत होण्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहे.


Video: ममता बॅनर्जींंची काढली लाज, टिकटॉक व्हिडिओमुळे नुसरत जहाँ ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -