Video: ममता बॅनर्जींंची काढली लाज, टिकटॉक व्हिडिओमुळे नुसरत जहाँ ट्रोल

trinamool congress mp and actress nusrat jahan trolled for tiktok dance
Video: ममता बॅनर्जींंची काढली लाज, टिकटॉक व्हिडिओमुळे नुसरत जहाँ ट्रोल

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रसेच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. या दिवसांमध्ये नुसरत जहाँ अनेक व्हिडिओ शेअर करून लोकांचे मनोरंजन करत आहेत. काही दिवसांपूर्वी नुसरत यांनी टिकटॉकवर एक डान्स व्हिडिओ शेअर केल्या आहे. या व्हिडिओवर ट्रोलर्सने निशाणा साधला आहे. नुसरत जहाँ यांना या व्हिडिओवरून खूप ट्रोल करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी त्यांना आपल्या विभागातील लोकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे.

एका नेटकऱ्याने नुसरत जहाँ यांना ट्रोल करत लिहिलं आहे की, ‘बशीरहाट क्षेत्रातील लोकांना किराना सामान पुरवण्याऐवजी नुसरत जहाँ टिकटॉक करण्यामध्ये व्यग्र आहेत. तर दुसऱ्या नेटकऱ्याने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना टॅग करत लिहिलं आहे की, ‘तुम्ही कोणाला खासदार बनवले आहे? लाज वाटली पाहिजे.’ याशिवाय आणखीन एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘त्यांच्या मतदारसंघातील लोकांनी रेशनची मागणी केल्यामुळे त्यांना मारहाण केली असता खासदार व्हिडिओमध्ये करण्यात व्यस्त आहेत.’

हा व्हिडिओ नुसरत जहाँ यांनी हॅशटॅग ‘savagechallenge’ सोबत शेअर केला आहे. या व्हिडिओ नुसरत जहाँ डान्स करताना दिसत आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्या होत्या. बशीरहाटमध्ये ३.५ लाख मत त्यांनी जिंकली होती.


हेही वाचा – CoronaVirus: वायू प्रदूषणाच्या कणांवर आढळले कोरोना विषाणू!