घरदेश-विदेशआसाराम बापू, राम रहीम नंतर आता ज्योतिगिरी महाराजाचे दुष्कर्म उघड

आसाराम बापू, राम रहीम नंतर आता ज्योतिगिरी महाराजाचे दुष्कर्म उघड

Subscribe

ज्योतिगिरी महाराज सध्या फरार झाला आहे. त्याचे उज्जैन, गुरुग्राम, काशी, हरिद्वार या ठिकाणी आश्रम आहेत.

आसाराम बापू, राम रहीम या ढोंगी बाबानंतर आता हरियाणा येथील आणखी एका ढोंगी बाबाचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. या बाबाचे नाव ज्योतिगिरी महाराज असे आहे. या बाबाने आपल्या आश्रममधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हा ढोंगी बाबा फरार झाला आहे. हे प्रकरण हरियाणाच्या गुरुग्राम राज्यातील बहेडा गावाचे आहे. या ज्योतिगिरी महाराजाचे अनेक अश्लिल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुग्राम सायबर पोलीस हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचाही तपास लावत आहेत.

महिला आयोगाला पाठवली तक्रारीची कॉपी

ज्योतिगीरी महाराज आपल्या आश्रमात येणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करतो. त्याने याअगोदरही आश्रमातील महिलांवर अत्याचार केला आहे. त्याचे लैंगिक शोषणाचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासंदर्भात ‘आजतक’ने माहिती दिली आहे. ‘आजतक’च्या हाती या बाबाच्या दुष्कर्माचा व्हिडिओ लागला आहे. ज्योतिगिरी बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीची एक कॉपी राष्ट्रीय महिला आयोग, हरियाणा महिला आयोग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

बाबाची कित्येक नेत्यांशी जवळीक

बाबा ज्योतिगीरीचा हैद्राबाद सरकारमधील मोठमोठ्या नेत्यांशी संबंध आहे. त्यामुळे आतापर्यंत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकला नाही. आता त्याच्या दुष्कर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर अनेकांनी पोलीस ठाण्याबाहेर जाऊन पीडितेला न्याय मिळावा, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे हे प्रकरण जगासमोर आले. दरम्यान, प्रकरण जगासमोर येताच ज्योतिगीरी महाराज फरार झाला आहे. या महाराजाचे उज्जैन, गुरुग्राम, काशी, हरिद्वार या ठिकाणी आश्रम आहेत.


हेही वाचा – अमानवी! बापाचा बलात्कार, आईची जबरदस्ती; मुलीनं टेकले हात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -