घरदेश-विदेशडॉ. मनमोहन सिंह यांच्या भाष्यावर निर्मला सीतारामन यांचे मौन

डॉ. मनमोहन सिंह यांच्या भाष्यावर निर्मला सीतारामन यांचे मौन

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत असताना देशात आर्थिक मंदी असल्याचा आरोप फेटाळून लावला. देशाचा आर्थिक विकास दर घटत असून अनेकांना रोजगार गमवावा लागत आहे, असे प्रश्न निर्मला सीतारामन यांना आज विचारण्यात आले होते. मात्र त्यावर त्यांनी पत्रकारांना कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी अर्थव्यवस्थेची मंदी ही मानवनिर्मित असून मोदी सरकारची चुकीचे धोरण याला कारणीभूत असल्याचे सांगितले होते. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतरही निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेसंबंधी प्रश्नाला बगल दिली.

माध्यमांशी बोलत असताना अर्थमंत्री म्हणाल्या की, सरकार विविध क्षेत्रातील उद्योगांशी चर्चा करत आहे. काही क्षेत्रांना मदत हवी असल्यास ती देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. २३ ऑगस्ट रोजी आम्ही तशी घोषणाही केली आहे. मागच्या शुक्रवारीच निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय बँकाचे एकत्रीकरण होणार असल्याचे सांगितले आहे. आता सरकारी बँकाची संख्या २७ वरुन १२ होणार आहे.

- Advertisement -

डॉ. मनमोहन सिंह यांच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंह यांनी राजकीय सूडापेक्षा विवेकाचा आवाज ऐकला पाहीजे. मनमोहन सिंह जे म्हणाले त्यावर मी काहीही बोलू इच्छित नाही. त्यांनी बोलावे आणि मी ते ऐकावे, अशी प्रतिक्रिया सीतारामन यांनी दिली.

बँकाच्या एकत्रीकरणामुळे नोकऱ्या जाणार नाहीत

राष्ट्रीय बँकाचे एकत्रीकरण करुन त्याची संख्या २७ वरुन १२ करण्यात येणार आहे. हे करत असताना कोणालाही बेरोजगार व्हावे लागणार नाही, अशी खात्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. बँकांच्या कर्मचारी संघटना एकत्रीकरणाच्या निर्णयाला विरोध करत असल्याच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी हे वक्तव्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -