घरदेश-विदेशविमान हल्ल्यानंतर पाकिस्तानी वनविभागाने दाखल केली FIR

विमान हल्ल्यानंतर पाकिस्तानी वनविभागाने दाखल केली FIR

Subscribe

भारतीय विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील झाडांचे नुकसान झाले. भारत "पर्यावरणीय दहशतवाद" परसवत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने वायू हल्ला केला. भारताच्या विमानांनी प्रथमच एलओसी बॉर्डर ओलांडून बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्धवस्थ केला होता. भारताने रात्रीच्या वेळी ही कारवाई केली. भाराताने केलेल्या वायू हल्ल्यानंतर सुरुवातीला पाकिस्तानने कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा केला होता. मात्र आता पाकिस्ताच्या वनविभागाने एक नवीन खेळी खेळली आहे. भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानी वनविभागाने भारतीय वायू सेनेवर गुन्हा नोंदवला आहे. पर्यावरणाला नुकसान पोहचवल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. भारतीय वायूसेनेने टाकेल्या बॉम्बमुळे तब्बल १९ झाडांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी FIR मध्ये म्हटलं आहे.

पर्यावरणाचे नुकसान

“जागतिक दृष्या पर्यावरणा ऱ्हास होत आहे. याचा फटका पाकिस्तानलाही लागला आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील पर्यावरणाचे मोठं नुकसान झाले आहे. भारतालने पाकिस्तानच्या भागात केलेल्या हल्ल्यात १९ झाडांचे नुकसान झाले आहे.” पाकिस्तानचे मंत्री, मलिक अमीन

- Advertisement -

जैश ए मोहम्मदच्या तळावर केला होता हल्ला

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. यानंतर भारताने जैश ए मोहम्मद संघटनेच्या तळाचा शोध घेतला होता. भारताच्या वायू दलाने बालाकोट येथे बॉम्बहल्ला करून त्याचा तळ उध्वस्त केला. या हल्ल्यात ३०० दहशतवादी मारले गेले असल्याचा दावा भारताने केला. भारताच्या वायू दलाने या हल्ल्याचे पुरावे केंद्र सरकारला सोपवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -