घरदेश-विदेशपेट्रोल पंपाशेजारी असलेल्या फटाक्यांच्या स्टॉलला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या फटाक्यांच्या स्टॉलला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

Subscribe

अमरावती – आंध्र प्रदेशमधील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर फटाक्यांनी पेट घेतल्याने आगीने रौद्र रुप धारण केलं. तसंच, फटाक्यांचा जोरात आवाज येऊ लागला. ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

या आगीत फटाक्यांची तीन दुकाने जळून खाक झाली आहे. अग्नीशमन दलाने तत्काळ कार्यवाही केल्याने इतर दुकानांना आगीच्या झळा बसल्या नाहीत. आगीमुळे झालेल्या विस्फोटक आवाजामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची झोप उडाली.

- Advertisement -

आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये असलेल्या एका मैदानात फटाक्यांचे स्टॉल्स लावले आहेत. तसंच, या मैदानाच्या बाजूला पेट्रोल पंप आहे आहे. सुदैवाने आग पेट्रोलपंपपर्यंत पोहोचली नाही. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीला बंदी ठेवण्यात आली. फक्त मोकळ्या मैदानावरच फटाके विक्री करता येत आहे. आग लागलेलं ठिकाण हे मैदनातील आहे. पंरतु, मैदानाच्या बाजुलाच पेट्रोल पंप असल्याने येथे फटाके विक्रीला स्थानिकांकडून मनाई करण्यात आली होती. परंतु, तरीही येथे स्टॉल थाटल्याने आग लागली. अग्नीशमन दलाने तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचू शकली नाही.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -