घरमनोरंजनजॅकलिन माझ्यावर प्रेम करत होती, पण... सुकेश चंद्रशेखरने पत्रातून केला खुलासा

जॅकलिन माझ्यावर प्रेम करत होती, पण… सुकेश चंद्रशेखरने पत्रातून केला खुलासा

Subscribe

खंडणीखोर सुकेश चंद्रशेखर 200 कोटींच्या खंडणी वसूल केल्याच्या आरोपाप्रकरणी दिल्लीच्या मंडोली तुरुंगात आहे. या प्रकरणात सुकेश सोबतच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर देखील आरोप केले जात आहेत. नुकताच 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा दिला. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, सुकेशने आपल्या वकिलांना एक पत्र लिहिलं आहे. जे आता सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये सुकेशने जॅकलीन फर्नांडिसबाबत एक खुलासा केला आहे.

सुकेशने या पत्रामध्ये लिहिलंय की, 200 कोटींच्या घोटाळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा कोणताच सहभाग नाही. तसेच त्याने जॅकलीन फर्नांडिसला महागड्या भेट वस्तू भेट म्हणून दिल्या असल्याचे सांगितले. मात्र, या सगळ्या भेट वस्तू त्याने ते नात्यामध्ये होते त्यामुळे दिले. तसेच सुकेश पुढे म्हणाला की, ही खूप वाईट गोष्ट आहे की, या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसला आरोपी बनवलं जात आहे. मी याआधी देखील स्पष्ट सांगितलं होत की आम्ही एका नात्यामध्ये होतो आणि त्यामुळेच मी तिला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्यात तिचा काय दोष?

- Advertisement -

सुकेश पुढे म्हणाला की, जॅकलीनने माझ्याकडे फक्त प्रेम आणि तिच्यासोबत उभं राहण्याव्यतिरिक्त बाकी काहीही मागितलं नाही. जॅकलीन आणि तिच्या कुटुंबावर खर्च केलेला एक-एक पैसा मी कमावलेला आहे आणि लवकरच हे सिद्ध देखील होईल.

जॅकलीन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा
सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा दिला आहे. न्यायालयाने जॅकलिनची अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता जॅकलिन तिच्या वकिलांसह न्यायालयात पोहोचली. गेल्या सुनावणीतही न्यायालयाने तिचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पतियाळा हाऊस कोर्टाने 26 सप्टेंबर रोजी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 50,000 रुपयांच्या जामीनावर अंतरिम जामीन मंजूर केला होता.

- Advertisement -

हेही वाचा :

मनी लाँड्रिंग प्रकरणातून अभिनेत्री जॅकलीनला दिलासा; अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -