घरदेश-विदेशतेजस एक्स्प्रेस उशिरा पोहोचल्यास मिळणार प्रवाशांना भरपाई

तेजस एक्स्प्रेस उशिरा पोहोचल्यास मिळणार प्रवाशांना भरपाई

Subscribe

पहिली खासगी एक्स्प्रेस म्हणून ओळख ठरणारी तेजस एक्स्प्रेस जर आता उशिरा झाली तर प्रवाशांना विलंब भरपाई दिली जाणार आहे. एक्स्प्रेस १ तास लेट झाली तर शंभर रुपये तर दोन तास लेट झाली तर २५० रुपये विलंब भरपाई देण्यात येणार आहे. सोबतच २५ लाखांचा विमा देखील देण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने दाखल झालेली तेजस एक्स्प्रेस शनिवारी पहिल्यांदाच उशिरा पोहोचली. त्यामुळे आता उशिरा पोहोचण्याच्या कारणामुळे प्रवाशांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. शनिवारी ही ट्रेन दोन्ही दिशेकडून उशिरा पोहोचली. या ट्रेनमध्ये लखनऊहून दिल्लीला येणाऱ्या या ट्रेनमध्ये एकूण ४५१ प्रवासी होते. तसंच, दिल्लीहून लखनऊला जाणारे एकूण ५०० प्रवासी होते.

एक्स्प्रेस ३ तासांपेक्षा जास्त उशिरा –

तेजस एक्स्प्रेस नवी दिल्ली स्टेशनला पोहोचण्याचा वेळ दुपारी १२ वाजून २५ मिनिटे हा असूनही ही ट्रेन ३ वाजून ४० मिनिटांनी स्टेशनला पोहोचली. तर, लखनऊला ही ट्रेन १० वाजून ०५ मिनिटांनी पोहोचणं अपेक्षित होतं. पण, ही एक्स्प्रेस तब्बल १ तास ३५ मिनिटे लखनऊला पोहोचली.

- Advertisement -

प्रवाशांना मिळणार विलंब भरपाई –

आता या सर्व प्रवाशांना एक्स्प्रेस उशिरा झाल्याकारणाने विलंब भरपाई म्हणून २५० रुपये दिले जाणार आहेत. आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या फोनवर एक लिंक पाठवण्यात आली आहे. या लिंक वर क्लिक केल्यानंतर प्रवासी भरपाईच्या रकमेसाठी क्लेम करु शकतील.

काय आहे नियम आहेत ?

ट्रेनच्या लेट होण्याच्या स्थितीतून प्रवाशांना भरपाई दिली जाणार आहे. जेव्हा ट्रेन एका तासापेक्षा जास्त लेट होईल तेव्हा प्रवाशांना १०० रुपये आणि दोन तासांपेक्षा जास्त काळ लेट झाली तर २५० रुपये रिफंड केले जातील.

- Advertisement -

२५ लाखांच्या विम्याची सोय –

आयआरसीटीसीच्या नियमांनुसार, दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना मोफत २५ लाख रुपयांचा रेल्वे प्रवासी विम्याची सोय दिली जाणार आहे. तसंच, प्रवासादरम्यान चोरी किंवा दरोडा अशा काही आपातकालीन घटना घडल्या तर प्रवाशांना १ लाखांपर्यंत प्रवासी विमा दिला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -