घरदेश-विदेशभारतात पहिल्यांदाच The India Toy Firचे आयोजन, मुलांच्या शैक्षणिक विकासात जाणून घ्या...

भारतात पहिल्यांदाच The India Toy Firचे आयोजन, मुलांच्या शैक्षणिक विकासात जाणून घ्या खेळण्यांचे महत्त्व

Subscribe

२७ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत ही जत्रा आयोजित करण्यात येणार आहे.

भारताच्या खेळणी उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी भारत सरकार पहिल्यांदा The India Toy Fair आयोजित करत आहे. ज्यात विविध प्रकारची खेळणी पहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे ही खेळणी लहान मुलांच्या आयुष्यात त्यांच्या अभ्यासाचा भाग कसा बसू शकतात हे तज्ज्ञांकडून जाणून घेता येणार आहे. यासाठी एक खास वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये भाग घेऊन प्रत्येक वयोगटातील मुलांच्या खेळण्यांचा गरजा समजून घेता येणार आहे. आर्टस अन्ड अँस्थेटिक्स विभाग, राष्ट्रिय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. या जत्रेचे स्वरुप ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत ही जत्रा आयोजित करण्यात येणार आहे. विविध प्रकारची मजेदार खेळणी,विज्ञा खेळणी, आधुनिक खेळणी, स्थानिक खेळणी,शैक्षणिक खेळणी आणि आधुनिक इलेक्ट्रिक खेळणी पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

विविध खेळ आणि खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी ही सुवर्ण संधी देण्यात आली आहे. या कार्यक्रमात निवडक विद्यार्थी आणि शिक्षकांना संधी मिळणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खेळणींना फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या ऑनलाईन जत्रेत सहभागी होण्यासाठी www.theindiatoyfair.in या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी लागणार आहे.

जागतिक गुंतवणूकदार, निर्यातदार, उद्योगनेते,एमएसएमी, एसएमई आणि स्थानिक उद्योग यांचा हा मोठा मेळा असणार आहे. भारतातील १हजारांहून अधिक कंपन्या आणि कुशल कारागिर त्याच्या अद्वितीय कलाकृती या कार्यक्रमात सादर करणार आहेत. आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊन आपली नवीन ओळख तयार करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. ७ लाख कोटी जागतिक खेळण्यांच्या व्यापारात येत्या काही वर्षांत सरकारच्या मदतीने खेळणी उद्योजक आणि कारागिर ४०० दशलक्ष खेळण्यांचा व्यावसाय चालविण्यास सक्षम असेल हे ध्येय आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर लाँच; जाणून घ्या फिचर्स

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -