घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये कोरोनाचा वाढला धोका; दिवसभरात ४२४ नवे रुग्ण

नाशिकमध्ये कोरोनाचा वाढला धोका; दिवसभरात ४२४ नवे रुग्ण

Subscribe

नाशिक शहरात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जिल्ह्यात बुधवारी (दि.२४) दिवसभरात ४२४ नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये नाशिक शहर २६०, नाशिक ग्रामीण १३१, मालेगाव शहर २५ आणि जिल्ह्याबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात २४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नाशिक शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात एक लाख २० हजार ८७७ रुग्ण कोरोनाबाधित आले. त्यापैकी एक लाख १६ हजार ६२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या दोन हजार १६२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक शहर दीड हजार, नाशिक ग्रामीण ४९८, मालेगाव १५३ आणि जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -