घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये मिनी बस दरीत कोसळून पाच ठार, १५ जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये मिनी बस दरीत कोसळून पाच ठार, १५ जखमी

Subscribe

शुक्रवारी संध्याकाळी बिलावलमधील सिला गावात एका तीव्र वळणावर मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला

जम्मू-काश्मीरः जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मिनी बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळून एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात अन्य १५ जण जखमी झाले आहेत. (Jammu Kashmir Kathua Accident)

पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांनाही माहिती दिली आहे. याशिवाय पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी बिलावरमधील सिला गावात एका तीव्र वळणावर मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली. ही मिनी बस एका खासगी एजन्सीची होती. बस मोंडली गावातून धनू पारोळ गावाकडे जात होती. त्या दरम्यानच तिचा अपघात झालाय. यामध्ये बसमध्ये प्रवास करणाऱ्या ६० वर्षीय महिलेसह ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एका व्यक्तीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. बंटू, हंस राज, अजित सिंग, अमरू आणि काकू राम अशी मृतांची नावे आहेत.


हेही वाचाः Bomb Threat Airplane: मॉस्को-गोवा विमानाला बॉम्बनं उडवण्याची धमकी, विमान उझबेकिस्तानकडे वळवले

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -