आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या प्रकृतीत बिघाड; केले ICU मध्ये दाखल

आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांची प्रकृती काल, गुरूवारी अचानक जास्त बिघडली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तरुण गोगोई यांना २६ ऑगस्ट रोजी गुवाहाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली होती. उपचारानंतर काही दिवसांनी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतरही गुवाहाटीच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तरुण गोगोई आसाम राज्याचे २००१ ते २०१६ असे सलग १६ वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. तरुण गोगोई यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टरांची एक विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे. या टीमच्या निगराणीखाली गोगोई यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा –

नव्या कृषी विधेयकांना विरोध; शेतकरी संघटनांचा आज ‘भारत बंद’चा नारा