घरताज्या घडामोडीमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा मुलाचा तृणमूलमध्ये प्रवेश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा मुलाचा तृणमूलमध्ये प्रवेश

Subscribe

अभिजित मुखर्जी यांनी २०१२ आणि २०२१ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर बंगालच्या जंगीपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढली

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ( Pranab Mukherjee) यांचा मुलागा अभिजीत मुखर्जी (Abhijit Mukherjee) यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. (Former President Pranab Mukherjee’s son Abhijit Mukherjee joins Trinamool congress party) तृणमूल पक्षांच्या मुख्यालयात अभिजीत मुखर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तृणमूल पक्षात प्रवेश केला. अभिजित मुखर्जी यांनी २०१२ आणि २०२१ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर बंगालच्या जंगीपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढली होती. २०१९मध्ये देखील त्यांनी काँग्रेसच्या त्याच जागेवरुन तिकीट दिले मात्र त्यांचा पराभव झाला.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करताच, ममता बॅनर्जी ज्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये भाजपला जातीय हिंसाचाराच्या लाटेला रोखले आहे त्यावरुन मला विश्वास आहे की भविष्यात इतरांच्या मदतीने त्या संपूर्ण भारतात अशीच कामगिरी करु शकतात, असे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी असे म्हटले की, काँग्रेसमध्ये कोणतेही पद किंवा जबाबदारी त्यांच्यावर नाही. एक सामान्य सैनिकाप्रमाणे मी तृणमूल काँग्रेसमध्ये आलो आहे. येथे जी जबाबदारी मला मिळेल ती मी संपूर्ण निष्ठेने पार पाडेन. अखंडता आणि धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी मी काम करेन, असे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले आहे.

मागील काही आठवड्यांपासून जांगीपूर काँग्रेस खासदार तृणमूल काँग्रेससोबत चर्चा करित होते. एक महिन्यापूर्वी अभिजीत मुखर्जी यांनी कोलकता तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतली होती. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये सहभाग घेतला आहे. मुकुल रॉय यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूलमध्ये प्रवेश घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – युपीमध्ये एकही मुस्लिम जिल्हा पंचायत अध्यक्ष नसल्याच्या मुद्द्यावरून असदुद्दीन ओवैसींची अखिलेश यादवांवर टीका

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -