घरदेश-विदेशराज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार चंदन मित्रा यांचं निधन

राज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार चंदन मित्रा यांचं निधन

Subscribe

राज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार डॉ. चंदन मित्रा यांचं बुधवारी रात्री दिल्लीत निधन झालं. चा मुलगा कुशान मित्रानं यासंदर्भात माहिती दिली. मित्रा द पायनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक होते. (Former Rajyasabha Member Chandan Mitra passed away)

चंदन मित्रा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय होते. मित्रा ऑगस्ट २००३ ते २००९ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. जून २०१० मध्ये ते मध्य प्रदेशमधून भाजपकडून राज्यसभेत निवडून आले. २०१६ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले. केंद्रात सत्ताबदल होऊन मोदी सरकार आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने त्यांना पक्षात महत्वाच्या जबाबदाऱ्यापासून दूर ठेवल्याचं म्हटलं जातं. जुलै २०१८ मध्ये मित्रा यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि ते तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाले होते.

- Advertisement -

माध्यमांसोबतच त्यांनी राजकीय जगातही आपली ओळख निर्माण केली – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मित्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. “डॉ. चंदन मित्रा यांची ओळख ही कुशाग्र बुद्धी आणि दूरदृष्टी असणारी व्यक्ती अशी होती. राजकारणासोबतच माध्यमांच्या जगातही त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनामुळे मी दुःखी असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती,” असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -