Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश गौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक

गौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक

Subscribe

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात आरोपींना अटक करण्याचे सत्र सुरुच आहे. या हत्येत सहभागी असणाऱ्या आणखी दोघांना आता अटक करण्यात आली असून अटक आरोपींची संख्या ९ झाली आहे.

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश यांची बंगळुरूमध्ये सप्टेंबर २०१७ मध्ये राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रामचंद्र बड्डी आणि गणेश मिस्की अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून त्यांना हुबळी शहरातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेतले आहे. या हत्येप्रकरणात परशुराम वाघमारे हा मुख्य आरोपी असून त्यानेच लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे.

आरोपीच्या माहितीवरुनच दोघांना अटक

काही दिवसांपूर्वी या हत्येत सहभाग असणाऱ्या मोहन नायक या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावरच या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल, हत्यारे आणि इतर पुरावे नष्ट केल्याचा आरोप या दोघांवर करण्यात आला आहे. २०१७ साली सप्टेंबरमध्ये ही हत्या करण्यात आली होती. हत्या करणाऱ्या परशुराम वाघमारेला विशेष ट्रेनिंगही देण्यात आल्याचे त्याने कबुल केले आहे. मोहन नायक, परशुराम वाघमारे, अमोल काले, मनोहर एडवे, सुजीत कुमार, नवीन कुमार आणि अमीत देगवेकर अशी अटक करण्यात आलेल्या ७ जणांची नावे आहेत. त्यामध्ये आता रामचंद्र बड्डी आणि गणेश मिस्की या दोघांनाही अटक करण्यात आल्यामुळे ही संख्या आता ९ झाली आहे. या दोघांनाही मॅजिस्ट्रेट कोर्टात मंगळवारी हजर करण्यात आले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कशी झाली गौरी लंकेश यांची हत्या?

- Advertisement -

जेष्ठ पत्रकार गौरा लंकेश यांची २०१७ साली बेंगलोरमध्ये असणाऱ्या त्यांच्या राहत्या घरात गोळ्या झाडुन हत्या करण्यात आली होती. या हत्येवेळी दोन आरोपींनी गाडीवरुन येऊन लंकेश यांच्यावर गोळीबार केला होता ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणात सहभागी असणाऱ्या आरोपींना टप्प्याटप्पाने ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींची संख्या आतापर्यंत आली आहे. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -