घरदेश-विदेशभाटिया कुटुंब आत्महत्येनंतरही आलं परत?

भाटिया कुटुंब आत्महत्येनंतरही आलं परत?

Subscribe

बुधवारी भाटिया कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांना घराच्या गच्चीवर काही धुतलेले कपडे आणि धुतलेली भांडी ठेवलेली दिसली. बुराडी गूढ मृत्यू प्रकरणातील रहस्य वाढतच चाललं आहे.

बुराडीच्या संतनगरमधील ११ जणांची गूढ मृत्युबद्दल रोज नव्यानव्या रहस्यमय गोष्टी समोर येत आहेत. यामध्ये नवं रहस्य समोर आलं आहे. बुधवारी भाटिया कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांना घराच्या गच्चीवर काही धुतलेले कपडे आणि धुतलेली भांडी ठेवलेली दिसली. ज्या दिवशी या आत्महत्या झाल्या त्या दिवशी हे कपडे भरलेली बादली आणि भांडी ठेवली नसल्याचं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे १ जुलैपासून या घराला सील लावण्यात आलं आहे. फक्त पोलीस आणि क्राईम ब्रांचची टीम इथं तपासासाठी येते. त्यामुळं ही बादली, कपडे आणि भांडी नक्की कोणी ठेवली आहेत? कोणाची आहेत? हा मोठा प्रश्न शेजाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

तपास करावा लागेल – पोलीस

पोलिसांना याबाबत विचारणा केली असता या सर्व सामानाचा तपास करण्यात येण्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर शेजारील लोकांना केवळ आश्चर्यच वाटलं नाही तर सध्या ते प्रचंड घाबरलेले आहेत. याबरोबरच रजिस्टरमध्ये भाटिया कुटुंबानं लिहिलं होतं की, देवाला भेटून आम्ही परत येऊ. त्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर शेजारच्यांच्या घरातील मुलं रात्री घाबरून उठून ‘दुकानवाले काका भूत होऊन तर परत येणार नाहीत ना?’ असे प्रश्न भीतीनं विचारत आहेत अशी माहिती मिळाली आहे. तर शेजारील महिलेच्या सांगण्यानुसार, त्यांच्यामधील भीती इतकी वाढली आहे की, आता घर बदलण्याचा विचार केला जात आहे. भाटिया कुटुंब इथं गेल्या २३ वर्षांपासून राहात होतं.

- Advertisement -

रोज नव्या घटना समोर

रोज नवनवीन घटना समोर येत असून पोलीस आत्मा आणि इतर गोष्टींसाठी विशेष पथकाची मदत घेण्यात येणार असल्याचंदेखील सांगण्यात येत आहे. ही केस हत्या म्हणून नोंदवण्यात आली असली तरीही मिळालेला सर्व पुरावा हा आत्महत्येचा आहे. तर सध्या ललित भाटियावरदेखील संशयाची सुई आहे. सहा दिवस होऊनही याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तर आयएएनएसनं दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रँचनं आपला केस अहवाल दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना पाठवला असून केस बंद करण्याचा निर्णय सध्या घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -