घरताज्या घडामोडीToday Gold Rate: सोन्याच्या भावात कमालीची घसरण, चांदी महागली

Today Gold Rate: सोन्याच्या भावात कमालीची घसरण, चांदी महागली

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात कमालीची घसरण होत आहे. त्यामुळे येन सनासुदीच्या दिवसांमध्ये सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोने खरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आज (८ मार्च) सोमवारीही सोन्याच्या दरात तब्बल ४०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्चेंजवरही (एमसीएक्स) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एप्रिलच्या वायदा बाजारात सोन्याच्या आज सोन्याच्या प्रति १० ग्रॅम भाव ४४४४५ रुपये इतका होता. या दरात २३८ रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसभरात सोन्याचे भाव ४४२४९ रुपयांवर पोहचले होते. तर चांदीच्या भावात आज १५२ रुपयांची वाढ झाली त्यामुळे चांदीचा प्रति किलो भाव ६५७५५ रुपये झाला आहे. शुक्रवारी रात्री बाजार बंद होताना सोन्याचा भाव ९९ रुपयांनी किंचित वधारला आणि तो ४४६४० रुपयांवर बंद झाला.

दरम्यान, good returns या वेबसाईटच्या माहितीनुसार, आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३६८० रुपये इतका खाली आला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४६८० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४१५० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८१६० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२२१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४६०५० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४१२० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६७६० रुपये आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या दरात ७.२७ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे.’एमसीएक्स’वर सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत २१ टक्के घसरले आहेत. जागतिक कमॉडिटी बाजारात सोने जवळपास १५ टक्के स्वस्त झाले असून ते १७०० डॉलरच्या खाली आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा- मराठा आरक्षणावर १५ मार्चला पुढील सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -