घरदेश-विदेशGold Price Today: सोने-चांदीचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा...

Gold Price Today: सोने-चांदीचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

Subscribe

तुम्ही घरबसल्या सोन्याचे दर सहज पाहू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढउतार पाहायला मिळतेय. ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सोने-चांदी बाजारपेठेत बदल होत असल्याचे म्हटले जातेय. त्यामुळे तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ही सुवर्ण संधी आहे, कारण सोन्याचा भाव पुन्हा एकदा 48 हजारांच्या (Gold Price Today) खाली आला आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्यासोबत चांदीच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाली. MCX वर, फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.61 टक्क्यांनी किंचित वाढ झाली तर चांदीच्या किमती (Silver Rate Today) ०.०४ टक्क्यांनी घसरल्या आहेत.

ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर सोन्याने 56,200 रुपये प्रति तोळाची सर्वोच्च पातळी (Gold Rate on Record High) गाठली होती. आज, MCX वर फेब्रुवारीच्या सोन्याची वायदे किंमत 47,775 रुपये प्रति तोळाच्या पातळीवर आहे. अर्थात आज सोने सुमारे 8,425 रुपयांनी स्वस्त आहे.

- Advertisement -

 सोने तब्बल 8 हजारांनी झाले स्वस्त

२०२० च्या ऑगस्टमध्ये सोन्याचा दर MCX वर सोन्याचा दर 56 रुपये प्रति तोळा इतक्या सर्वोच्च पातळीवर पोहचला होता. मात्र हा दर आता 47,481 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात 8 हजारांची घट पाहायला मिळाली. तर 1 किलो चांदीचा दर 60,400 रुपयांवर पोहचला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर 48820 रुपये आहे तर नाशिक, पुण्यात 48650 रुपये आणि नागपूरमध्ये 48820 रुपये किंमतीने 24 कॅरेट सोने विकले जातेय.

- Advertisement -

22 कॅरेट सोन्याचा दर

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर हा 46820 रुपये इतका आहे. तर पुणे, नाशिकमध्ये हाच दर 46130 रुपये झाला आहे. याशिवाय नागपूरमध्ये सोने 46820 रुपयाने प्रति 10 ग्रॅम इतके आहे.

चांदीचा दर

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये प्रति किलो चांदी 60400 रुपये इतकी आहे.

घरबसल्या पाहा सोन्याचा दर

तुम्ही घरबसल्या सोन्याचे दर सहज पाहू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.


coronavirus india : कोरोनाची त्सुनामी! देशात 7 महिन्यानंतर रुग्णसंख्या 1 लाखांच्या पुढे


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -