घरदेश-विदेशनोकरदारांसाठी खुशखबर...यंदा होणार अधिक टक्क्यांनी पगारवाढ

नोकरदारांसाठी खुशखबर…यंदा होणार अधिक टक्क्यांनी पगारवाढ

Subscribe

यंदाच्या वर्षात नोकरदारांच्या पगारात भरघोस वाढ होण्याची शक्याता असल्याचे एचआर कन्सल्टंन्सी कंपनी इयॉनने केलेल्या वार्षिक सर्व्हेमध्ये समोर आले आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याला पगार केव्हा वाढणार याची उत्सुकता असते. अशाच देशातील कर्मचारी वर्गाला दिलासा आणि आनंद देणारी बातमी आहे. ती म्हणजे यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारातवाढ होण्याची शक्यता आहे. यंदा कर्मचाऱ्यांना सरासरी ९.७ टक्क्यांची पगारवाढी मिळण्याची शक्यता असून कामाचे सर्वात चांगले सादरीकरण करणाऱ्याला १५.६ टक्के पगारवाढ मिळणार आहे. एचआर कन्सल्टंन्सी कंपनी इयॉनने केलेल्या वार्षिक सर्व्हेमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याचा नोकरदार वर्गाला होणार फायदा

यंदा उत्पादनांना देशांतर्गत मागणीत वाढ होण्याची अपेक्षा कंपन्यांनी व्यक्त केली आहे. तसेच महागाई दर कमी झाल्याने अर्थव्यवस्थाही मजबूत असणार आहे. याचा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे. गेल्या वर्षी ९.५ टक्के वेतनवाढ अपेक्षित धरण्यात आली होती. आशियाई प्रशांत क्षेत्रामध्ये दरवर्षीप्रमाणे भारत वेतनवाढीच्या दरामध्ये पहिल्या क्रमांकावर राहणार असून रशियामध्ये ७.२ टक्के वेतनवाढ होण्याची आशा आहे. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये कर्मचाऱ्यांना ६.७ टक्के वेतनवाढ मिळू शकणार आहे. ब्राझीलमध्ये ५.८ टक्के, अमेरिकेमध्ये ३.१ टक्के, ऑस्ट्रेलियामध्ये ३ टक्के आणि ब्रिटनमध्ये २.९ टक्के वेतनवाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

एचआर कन्सल्टंन्सी कंपनी इयॉनने केलेल्या वार्षिक सर्व्हेमध्ये केलेल्या अहवालानुसार कंझ्यूमर इंटरनेट कंपन्या, व्यावसायिक सेवा, लाईफ सायन्स, कंझ्यूमर प्रॉडक्ट आणि ऑटो क्षेत्रामध्ये दुहेरी अंकांची वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय चांगले सादरीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १.९ पटींनी वाढ होण्याची शक्यता असून चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरासरी १५.६ टक्के वेतनवाढ मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


हेही वाचा – बीसीसीआय कर्मचाऱ्यांची पगारवाढ नाही 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -