घरअर्थजगतखूशखबर! पीएम किसानचा पुढचा हप्ता लवकरच येणार, पटापट करा हे काम अन्यथा...

खूशखबर! पीएम किसानचा पुढचा हप्ता लवकरच येणार, पटापट करा हे काम अन्यथा पैसे लटकणार

Subscribe

आधार प्रणालीवर आधारित OTP खातरजमा करण्यासाठी शेतकऱ्यांना Kisan Corner मध्ये e-KYC पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक पडताळणीसाठी जवळच्या CSC सेंटरमध्ये जावे लागेल. हे काम घर बसल्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरूनही करता येईल.

नवी दिल्लीः पीएम किसानच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या 12 कोटी लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही e-KYC केलेले नसल्यास पीएम किसानचा पुढचा लटकणार आहे. त्यामुळे तुमचा 11 वा हप्ता खात्यात जमा न होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने e-KYC ला अनिवार्य केलेय. सरकारने 10व्या हप्त्याचे 2 हजार रुपये 1 जानेवारीला खात्यात टाकले आहेत. ज्या शेतकऱ्यांना 10 वा हप्ता मिळालाय, ते 11 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मोदी सरकारने PM Kisan Samman Nidhi योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार e-KYC आवश्यक केलीय.

आधार प्रणालीवर आधारित OTP खातरजमा करण्यासाठी शेतकऱ्यांना Kisan Corner मध्ये e-KYC पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक पडताळणीसाठी जवळच्या CSC सेंटरमध्ये जावे लागेल. हे काम घर बसल्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरूनही करता येईल.

- Advertisement -

जाणून घ्या, ऑनलाईन e-KYC कसे करायचे?

सर्वात आधी तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा
डाव्या बाजूला तुम्हाला असा टॅब मिळेल, सर्वात वर eKYC लिहिलेलं पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करा
आता तुम्ही तुमचा आधार नंबर आणि इमेज कोड टाकून सर्च बटनवर क्लिक करा
त्यानंतर आधारला मोबाईल लिंक करण्यासाठी नंबर डायल करा आणि ओटीपी मिळवा
जर सर्वकाही ठीक राहिले तर eKYC पूर्ण होणार आहे, अन्यथा Invalid लिहिलेलं पाहायला मिळेल
Invalid लिहिलेलं आल्यास तुमचा 10 वा हप्ता लटकणार आहे.
तुम्हाला आधार सेवा केंद्रात जाऊन हे सर्व ठीक करावे लागेल

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतःची नोंदणीदेखील करू शकता.

- Advertisement -

तुम्ही याप्रमाणे नोंदणी करू शकता

>> तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता फार्मर्स कॉर्नरवर जा.
>> येथे तुम्हाला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.


हेही वाचाः ‘नमस्ते ट्रम्प’ च्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला, ज्याला पंतप्रधान जबाबदार – नवाब मलिक

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -