घरदेश-विदेशनोटा उधळल्याने काँग्रेस नेता सोशल मीडियावर व्हायरल

नोटा उधळल्याने काँग्रेस नेता सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

चांगल्या कामासाठी नोटा उधळल्या असल्याचे दिले स्पष्टीकरण

पाटण येथील एका कार्यक्रमात पैसे उधळल्या प्रकरणी काँग्रेसचे नेते अल्पेश ठाकोर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांची निंदा केली. गुजरातचे ओबीसी नेता या  व्हिडिओत स्टेजवरून नोटा उधळताना दिसून येत आहेत.

नेमके काय झाले
राधनपूर शहरातील भाभर रोडवरील सदानंद कुमार शाळेत शनिवारी रात्री लोक संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलींसाठी वस्तीगृहाच्या निर्मीती करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात काही मोठे नेतेही उपस्थीत होते. गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख अमित चावडा या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थीत होते. दरम्यान स्टेजवर जाऊन ठाकोर यांनी कॅमेऱ्यासमोर नोटा उधळल्या. असे करत असताना तेथील लोकांनी त्यांचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरला झाला.

- Advertisement -

ठाकोर यांचे स्पष्टीकरण
या घटनेवर स्पष्टीकरण देतांना ठाकोर यांनी सांगितले आहे की,”पहिला लोक शान म्हणून नोटा उडवत असत मी मात्र एका चांगल्या कामासाठी पैसे उडवले आहेत. माझ्या कृत्यामुळे विवाद उद्भवेल याची मला खात्री होती मात्र मी उडवलेले पैसे चांगल्या कामासाठी उधळले. मी केवळ दहा रुपयांच्या नोटा उधळल्या आहेत. या कार्यक्रमात माझ्या व्यतिरीक्त १५ अन्य नेतेही उपस्थीत होते.”
भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशानुसार नोटांचा वापर माळा बनवण्यासाठी, सजावट करण्यासाठी, जाळण्यासाठी आणि कार्यक्रमादरम्यान उधळण्यासाठी केला जाऊ शकत नाही. नियम तोडल्यास तोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -