घरCORONA UPDATEअॅम्ब्युलन्सच्या बाहेर वाघांचा घेराव; महिलेने गाडीतच दिला बाळाला जन्म

अॅम्ब्युलन्सच्या बाहेर वाघांचा घेराव; महिलेने गाडीतच दिला बाळाला जन्म

Subscribe

गुजरातमध्ये अॅम्ब्युलन्समधून गरोदर महिला जात असताना तिची गाडीतच प्रसुती झाल्याची घटना समोर आली आहे. अनेकदा प्रवासात महिलांची प्रसुती झाल्याचे आपण ऐकले आहे. मात्र ही घटना काहीशी वेगळी आहे. गाडीच्या बाहेर वाघांचा घेराव असल्यामुळे जागेवरच उभ्या राहिलेल्या अॅम्ब्युलन्समधील महिलेची गाडीमध्ये प्रसुती करावी लागली आहे. गुजरातमधील गढडा तालुक्यातील भाका गावात ही घटना घडली आहे. २० मे रोजी रात्री साधारण १०.२० च्या दरम्यान भाका गावातील रहिवासी अफसाना सबरिश रफीक हिला अचानक प्रसुती कळा येऊ लागल्याने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी करण्यात आली. १०८ क्रमांकाला फोन लावून अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. त्यात बसून महिला निघाली असताना गावाबाहेर पडताच गढडापासूनच्या उनापर्यंतच्या वाटेत रसुलपरा गावाजवळ ४ वाघांनी गाडीचा मार्ग अडवून धरला.

हेही वाचा – Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १३८२ नवे रुग्ण, आज ४२ मृत्यू

- Advertisement -

…आणि वाघांनी गाडीची वाट सोडली 

गाडीतून बाहेर पडून या वाघांना हटकण्याचे कोणामध्येही धाडस नव्हते. मात्र महिलेची प्रकृती खुपच नाजूक होती. तिला प्रसुती कळा असह्य होत होत्या. त्यामुळे हॉस्पिटल काठणे गरजेचे होते. थोड्या वेळाने ईएमटी जगदीश मकवाना आणि पायलट भरत अहीर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून वाटेतच गाडीमध्ये महिलेची प्रसुती केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्या महिलेने एका चिमुकलीला जन्म दिला. दरम्यान, या वेळेत चार वाघ गाडीच्या अवतीभवतीच फेऱ्या मारत होते. तब्बल २० मिनिटं त्यांनी गाडीचा मार्ग रोखून धरला होता. २० मिनिटांनी बाळाचा जन्म झाल्यावर वाघांनीही गाडीची वाट सोडली. त्यानंतर अॅम्ब्युलन्सच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आई आणि बाळाला गढडामधील हॉस्पिटलमध्ये पोहोचवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -