घरदेश-विदेशपाकिस्तानचा खोटारडेपणा; हाफिज तुरुंग सोडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्यात

पाकिस्तानचा खोटारडेपणा; हाफिज तुरुंग सोडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्यात

Subscribe

हाफिज सईदला तुरुंगात डांबल्याचे वृत्त खोटे असून पाकिस्तान त्याच्या अटकेचा बनाव करत असल्याचे उघडकीस आले आहे. हाफिज सध्या पाकिस्तानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात मजेत जगत आहे.

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईच्या २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानने बुधवारी अटक केली. मात्र, हाफिज सईद हा तुरुंगात नसून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर आराम करत असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी हाफिजला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून अटक करण्यात आली होती. हाफिजला गुजरावाला तुरुंगात डांबल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. मात्र, गुरुवारी हाफिज जेलमध्ये नाही तर पोलीस अधिक्षकाच्या घरात थाटात आराम करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

अमेरिकेची मदत मिळावी म्हणून पाकिस्तानची चाल

सध्या पाकिस्तानात प्रचंड महागाई वाढली आहे. त्यात बरोजगारीच्या समस्येने देखील डोके वर काढले आहे. या आर्थिक संकटांला झुंज देणे पाकिस्तानला कठीण होऊन बसले आहे. याअगोदर अशी परिस्थिती उद्भवली नाही. कारण पाकिस्तानला अमेरिकेकडून कोट्यावधी रुपयांची मदत मिळत होती. मात्र, पाकिस्तान दहशतवादाला दुजोरा देऊन दहशतवाद्यांना आसरा देत असल्याचा आरोप करत अमेरिकेने ही मदत थांबवली. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली. पुढच्या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा अमेरिका दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते अमेरिकेला पुन्हा मदत सुरु करण्याची विनंती करणार आहेत. या दौऱ्याअगोदर पाकिस्तानने हाफिज सईदच्या अटकेचा बनाव रचला आहे. दरम्यान, हाफीज सईदच्या अटकेनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डोनाल्ड ट्रम्प यांनी दहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हाफिज सापडल्याचे म्हटले. मात्र, पाकिस्तानचा हा बनाव असल्याचे लवकरच उघड होईल.

- Advertisement -

हेही वाचा – हाफिजला अटक हे पाकिस्तानचे नाटक – शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -