घरट्रेंडिंगनोकियाचा नवा लोगो बघितला का? आकर्षक रंगसंगती आणि डिझाइन तुम्हालाही आवडेल!

नोकियाचा नवा लोगो बघितला का? आकर्षक रंगसंगती आणि डिझाइन तुम्हालाही आवडेल!

Subscribe

Nokia New Logo | कंपनीने ६० वर्षांनंतर पहिल्यांदा कंपनीचा लोगो बदलला आहे. तसंच, ही कंपनी आता पुन्हा बिझनेस टेक्नोलॉजी बनेल असंही कंपनीच्या सीईओंनी एका मुलाखतीत सांगितलं.

Nokia New Logo | कधीकाळी सर्वाधिक पसंतीस उतरलेली नोकिया कंपनी गेल्या काही वर्षांपासून बाजारातून बाहेर पडली आहे. मात्र, या कंपनीने कम बॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, कंपनीने ६० वर्षांनंतर पहिल्यांदा कंपनीचा लोगो बदलला आहे. तसंच, ही कंपनी आता पुन्हा बिझनेस टेक्नोलॉजी बनेल असंही कंपनीच्या सीईओंनी एका मुलाखतीत सांगितलं.

निळ्या बॅकग्राऊंडवर पांढऱ्या रंगाच्या अक्षरात असलेली नोकिया कंपनी वीस वर्षांपूर्वी प्रचंड प्रसिद्ध झाली होती. या कंपनीचे फिचर फोन मोठ्या प्रमाणात खपले. परंतु, फिचर फोन जाऊन बाजारात स्मार्ट फोन्स आले. नोकिया कंपनीने मात्र आपल्या प्रोडक्टमध्ये नाविन्य न आणता जुन्याचीच कास धरली. त्यामुळे ग्राहकवर्गाने नोकियाकडे पाठ दाखवली. अॅन्ड्रॉइडच्या जमान्यात त्यांनी मायक्रोसॉफ्ट व्हर्जन लॉन्च केले. पण त्यालाही अधिक पसंती मिळाली नाही. अखेर, नोकियाने आता बदलायचे ठरवले आहे. याची सुरुवात त्यांनी लोगोपासून केली आहे. निळ्या-पांढऱ्या रंगाचा लोगो बदलून त्यांनी आता रंगीबेरंगी लोगो केला आहे. त्यासाठी ५ वेगवेगळ्या डिझाईन्सचा वापर करून NOKIA लिहिले आहे.

- Advertisement -

कंपनीचे सीईओ Pekka Lundmark म्हणाले की, कंपनी आता बिझनेस टेक्नोलॉजी बनणार आहे. नोकिया आता वेगवेगळ्या बिझनेस आणि टेक्नॉलॉजित विस्तार करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकसुद्धा होणार आहे.

- Advertisement -

नोकियाचा नुकताच Nokia G22 हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे याचं बॅककव्हर १०० टक्के रिसायकल्ड प्लास्टिकपासून बनवण्यात आले आहे. तसंच, बॅटरी, डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट रिपेअर करण्याकरता ग्राहकांना सर्विस सेंटरलाही जाण्याची गरज नाही. कंपनी ग्राहकांना मोबाईलसह i Fixit किटही देत आहे. ज्यामुळे मोबाईल किंवा त्याचा कोणताही डिवाइस खराब झाल्यास ग्राहक घरच्या घरी रिपेअर करू शकणार आहे.


२००३ मध्ये Nokia 11 हा फोन लॉन्च झाला होता. जगभरात या फोनची विक्री २५- मिलिअन्सपेक्षाही जास्त झाली होती. हा फोन वापरायला सोपा आणि टिकायला मजबूत होता. त्यामुळे या फोनची सर्वाधिक विक्री झाली आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -