घरCORONA UPDATEखुशखबर! हेल्थ इन्शुरन्स भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ!

खुशखबर! हेल्थ इन्शुरन्स भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ!

Subscribe

भारतात कोरोना पॉजिटीव्ह रूग्णांची संख्या आता १२ हजारांच्या वर गेली आहे. त्यातील १ हजाराहून अधिक रूग्ण बरे झाले आहेत. तर ४१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बँकेच्या इएमआयला देखील सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर गाडीसाठी काढलेला इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी प्रिमीयर जमा करण्यासाठी अंतीम तारखेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १५ मे पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

ज्या ग्राहकांचा पॉलिसी रिन्युअल प्रिमीयरची तारीख लॉकडाऊनदरम्यान असेल अश्या लोकांसाठी सरकारने दिलासा दिला आहे. या संदर्भात सरकारने एक नोटीस ही प्रदर्शित केली आहे. २५ मार्चपासून १४ एप्रिल दरम्यान प्रिमीयर जमा करणाऱ्यांना २१ एप्रिलपर्यंतची मुदत वाढ देण्यात आली होती. हीच सुविधा हेल्थ पॉलिसीला पण लागू होत होती.

खात्यात इएमआयची रक्कम येणार परत

आरबीआयने दिलेल्या सुचनांनुसार इएमआय म्हणून कापलेली रक्कम बँक परत करेल. या सुचनांनुसार ३१ मे पर्यंत ग्राहकांना आपल्या कापल्या गेलेल्या इएमआयची रक्कम परत मिळणार आहे. तुमचे अकाऊंट कोणत्याही बँकेत असले तरी या सुविधेचा तुम्हाला लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे बँकांना ३ महिन्यांचा इएमआय परत देण्याचे आदेश आरबीआय कडून देण्यात आले आहेत. मार्चचा इएमआय कट झाल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयनुसार अनेक बँकांनी इएमआय कट केला होता.

- Advertisement -

आरबीआयने दिलेल्या सवलतीमध्ये सर्व वाणिज्य बँका (प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँक आणि स्थानिक क्षेत्रातील बँकांसह), सहकारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि मायक्रो-फायनान्स संस्थांसह) समाविष्ट आहेत. आरबीआयने सर्व टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरोटोरियम लागू केला आहे.


हे ही वाचा – खुशखबर! बँकेतून कापला गेलेला ईएमआय परत मिळणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -