घरदेश-विदेशदेशातील 'या' भागात वाढणार उष्णता; आयएमडीने व्यक्त केली चिंता

देशातील ‘या’ भागात वाढणार उष्णता; आयएमडीने व्यक्त केली चिंता

Subscribe

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे यावर्षी देशातील अनेक भागांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त उष्णता वाढण्याची शक्यता आहे आणि असे झाल्यास विविध भागांत वीजपुरवठ्याचीही मोठी समस्या निर्माण होऊ शकते, अशी चिंता आयएमडीने व्यक्त केली आहे. मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर पश्चिम भारतात उष्णता वाढणार असल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले आहे. त्यांनी असेही सांगितले की, येत्या काही दिवसात उष्णता वाढल्यामुळे पंखा, एसी, कुलर, फ्रीज या उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसात  विजेची मागणीही वाढणार आहे.

एका खासगी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे हवामानातील घटनांची वारंवारता आणि तीव्रता बिघडत आहे. गतवर्षी उपखंडात ज्या प्रकारची उष्णता जाणवली होती, त्याचा परिणाम आता समोर यायला सुरूवात झाली आहे. महापात्रा यांनी सांगितले की, देशातील अनेक राज्यांमध्ये मार्चमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे गहू, मोहरी, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या पिकांच्या किमतीवर परिणाम होणार असून किमतीही वाढू शक्यता आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत कडक उन्हाच्या तडाख्याने शेतीचे अजून नुकसान होईल याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यावर्षी मार्च महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे मानवी संस्कृती धोक्यात
काही दिवसांपूर्वी देशात यावर्षी उष्णतेची लाट सुरू झाल्याचा अहवाल आला होता. या अहवालानुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले होते. मात्र वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे मानवी संस्कृतीच धोक्यात येताना दिसत आहे. एका खासगी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय हवामान कार्यालयाने सांगितले होते की, 1901 सालापासून 2023 मधील फेब्रुवारी महिना भारतात सर्वात उष्ण राहिला आहे. ही भारतीयासाठी अत्यंत चिंतेची बाब असून गेल्या वर्षीच्या विक्रमी उष्णतेच्या लाटेची यंदाही पुनरावृत्ती पाहायला मिळेल, अशी भीती आता व्यक्त होत आहे. गतवर्षी उष्णतेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तापमान 50 °C (122 फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचले होते. हे उच्च तापमान कोणत्याही परिस्थितीत सामान्य माणसांसाठी असह्य करणारे आहे.

देशाच्या हवामान पद्धतींचा अभ्यास किरन हंट आणि रिडिंग विद्यापीठातील हवामान शास्त्रज्ञ्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, “उत्तर आफ्रिकेतील सहारा या वाळवंटापेक्षा भारत जास्त ओलसरपणा आहे. नोव्हेंबरमध्ये जागतिक बँकेच्या अहवालात इशारा दिला होता की, भारत पहिल्या स्थानांपैकी एक बनू शकतो. कारण जगात वेट-बल्बचे तापमान ३५ डिग्री सेल्सिअसचा उंबरठा ओलांडत आहे. अहवाल ज्यांनी लिहिला त्यांनी सांगितले की, “ही अचानक उद्भवलेली आपत्ती नसून एक संथ सुरूवात आहे आणि आपण हे थांबवू शकत नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -