घरताज्या घडामोडी'आता मंत्रालयाचा नवीन पत्ता शिवतीर्थ', मनसेची शिवसेनेवर टीका

‘आता मंत्रालयाचा नवीन पत्ता शिवतीर्थ’, मनसेची शिवसेनेवर टीका

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मानेच्या दुखण्यावर गेल्या महिन्यामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अधिवेशनातही मुख्यमंत्री हजर राहिले नाही यामुळे विरोधकांकडून टीकास्त्र डागण्यात येत आहे.

राज्यातील जनतेसाठी आता मुख्यमंत्री कार्यालयाचा नवीन पत्ता शिवतीर्थ असल्याची खोचक टीका मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जाऊन काम करत नसल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येते. कोरोना काळतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या शासकीय निवासस्थानाहूनच राज्याचे कामकाज पाहत आहेत. राज्यातील जनता त्यांचे प्रश्न घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जात आहेत. यामुळे मंत्रालयाचा नवीन पत्ता शिवतीर्थ असल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मानेच्या दुखण्यावर गेल्या महिन्यामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अधिवेशनातही मुख्यमंत्री हजर राहिले नाही यामुळे विरोधकांकडून टीकास्त्र डागण्यात येत आहे. मंत्रालयातील दालनातही मुख्यमंत्री क्वचितच जातात. राज्याचे काम अधिक प्रमाणात घरुनच पाहत आहेत. तसेच राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्री व्हिसीद्वारे उपस्थिती लावत असतात. राज्यातील जनतेला अडचणी आल्या तर ते मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाच्या दालनात जाण्याऐवजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जात असतात.

- Advertisement -

महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यातील आणि मुंबईतील नागरिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जात आहेत. आतापर्यंत अनेक संघटना, कामगारांचे शिष्टमंडळ, एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि टोल नाक्याबाबतचे प्रश्न नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मांडले आहेत. पूर्वी राज ठाकरेंच्या कृष्ण कुंज या निवासस्थानी नागरिक जात होते. तर आता नागरिक शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या नव्या निवासस्थानी लोक प्रश्न घेऊन जात आहेत.

- Advertisement -

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्री मंत्रालयात जात नसल्यामुळे शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. देशपांडे यांनी ट्विट केलं असून यामध्ये एक फोटो आणि मजकूर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनाचे चित्र रेखाटले आहे. तसेच तीन वर्षांचा कालावधी दाखवला असून कार्यालय बंद असल्यामुळे धूळ बसलेली दाखवले आहे. तसेच मजकूरामध्ये म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ आहे. असल्याची खोचक टीका केली आहे.


हेही वाचा : होमक्वारंटाईनबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -