घरदेश-विदेशsurat gas leak : सुरतमध्ये गॅस गळती; 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू, 25...

surat gas leak : सुरतमध्ये गॅस गळती; 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू, 25 जणांची प्रकृती चिंताजनक

Subscribe

गुजरातच्या सुरतमध्ये गुरुवारी सकाळी (आज) गॅस गळतीची मोठी दुर्घटना घडली आहे. सचिन परिसरात असलेल्या विश्व प्रेम डाईंग प्रिटिंग मिलजवळ टँकरमधून ही गॅस गळती झाल्याने गिरणीतील चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर २५ हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

प्रिटिंग मिलमध्ये झालेल्या गॅस गळती दुर्घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलजवळील नाल्यात अज्ञात टँकर चालकाने विषारी केमिकल टाकलं होतं. यादरम्यान त्यातून विषारी गॅस गळती सुरु झाली. त्यामुळे जवळच असलेल्या प्रिटींग मिलमधील कर्मचारी या गळतीच्या कचाट्यात सापडले.

- Advertisement -

सध्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरु केले आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या दुर्घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गॅस गळतीत गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

याआधी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कपड्याच्या कारखान्यात केमिकल वेस्ट टँक साफ करताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादच्या ढोलका येथील चिरीपाल ग्रुपच्या विशाल फॅब्रिक युनिटमध्ये हा अपघात झाला आहे. मात्र, या दुर्घटनेत गॅस गळती कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -