घरदेश-विदेशKarnataka Hijab Row: हिजाब प्रकरणी आज कर्नाटक मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची...

Karnataka Hijab Row: हिजाब प्रकरणी आज कर्नाटक मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक

Subscribe

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी सर्व राजकीय पक्षांना शेजारच्या कर्नाटकात हिजाबच्या वादावर आंदोलने आणि मोर्चे काढून महाराष्ट्राची शांतता बिघडू नये, असे आवाहन केले.

कर्नाटकात सुरु झालेला हिजाबचा वाद अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे याविषयावर योग्यती पाऊले उचलण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री या वादाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

यावर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुवस्था नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. शुक्रवारी सर्व मंत्री, उपायुक्त, पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक होणार आहे. ज्यामध्ये सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीची माहिती घेणार आहे. त्यानुसार आवश्यक त्या सूचनाही दिल्या जातील. मी शिक्षणमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या सतत संपर्कात आहे. तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

मुख्यमंत्री बसवराज यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सोमवारपासून दहावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. पदवी महाविद्यालये नंतर उघडली जातील. तर दुसऱ्या टप्प्यात अकरावी-बारावी आणि द्वितीय पदवी महाविद्यालयांचा विचार केला जाईल. जोपर्यंत उच्च न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. असे त्यांनी नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांशी संयम बाळगा, गृहमंत्र्यांच्या सुचना

कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच विद्यार्थ्यांशी वागताना आमच्या सरकारने पोलिसांना संयम बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सांगितले. “पोलिसांची तयारी पूर्ण तयारी असली तरी जनतेलाही सहकार्य करावे लागणार आहे. आमचे पोलीस पुरेसा संयम पाळत आहेत. पोलिसांनी रस्त्यावर येऊन कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई केल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येईल.” असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

राज्यातील सलोखा बिघडवण्यासाठी हिजाबचा शस्त्र म्हणून वापर करू इच्छिणाऱ्या अशा जातीयवादी घटकांना बळी पडू नये, असा सल्लाही मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवर मंत्री म्हणाले, बुधवारीच त्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र तो मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आला आहे. आमचे वकील इतर न्यायालयीन आदेशही न्यायालयात मांडतील. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल आणि लोकांनाही शांतता राखावी लागेल.

हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने गुरुवारी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचा आदेश जारी केला. सोमवारपासून शाळा सुरू होतील, मात्र महाविद्यालये सुरू होण्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

“राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची शांतता भंग करू नये”

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी सर्व राजकीय पक्षांना शेजारच्या कर्नाटकात हिजाबच्या वादावर आंदोलने आणि मोर्चे काढून महाराष्ट्राची शांतता बिघडू नये, असे आवाहन केले.

पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, केवळ राजकीय फायद्यासाठी दुसऱ्या राज्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवणे चुकीचे आहे. हे महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हिताचे नाही. मी सर्व पक्ष आणि संघटनांना या प्रकरणात सहकार्य करण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करतो. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


…तेव्हा आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, पण रोज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -