Independance Day : कोरोनाच्या सावटाखाली लाल किल्ल्यावर असा झाला स्वातंत्र्यदिन समारंभ!

यंदा कोरोनाच्या सावटाखाली लाल किल्ल्यावर विशिष्ट पद्धतीने स्वातंत्र्यदिन समारंभ करण्यात आला.

how coronavirus changed 74th independence day celebration at red fort
कोरोनाच्या सावटाखाली लाल किल्ल्यावर असा झाला स्वातंत्र्यदिन समारंभ!

देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यावेळी लष्करातील तिनही दलाचे प्रमुख तसेच जवान उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या तसेच मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा पार पडला. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन समारंभ करण्यात आला.

असे करण्यात आले होते आयोजन

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन समारंभाला येणाऱ्या प्रत्येक देशभक्ताच्या खुर्चीवर मास्क, सॅनिटायझर आणि एक हँडग्लोजचा जोड ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे दोन्ही खुर्च्यांमध्ये विशिष्ट अंतर देखील ठेवण्यात आले होते.

लाल किल्ल्यावर दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु, यंदा कोरोनाच्या महामारीमुळे तेवढी गर्दी दिसली नाही. तसेच विविध वयोगटातील लोक मोठ्या उत्साहात या कार्यक्रमास उपस्थिती लावतात. परंतु, यंदा दरवर्षी प्रमाणे तेवढी गर्दी दिसून आली नाही.

विशेष म्हणजे लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येक देशभक्ताचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत होते. तसेच त्यांना आत सोडताना त्यांच्या हातावर सॅनिटायझर दिले जात होते. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या खुर्चीवर ठेवण्यात आलेल्या मास्क, सॅनिटायझर आणि हँडग्लोजचा वापर करण्याचे देखील आवाहन केले जात होते.

काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशाला संबोधले. त्यावेळी ते म्हणाले की, ‘दरवर्षी या कार्यक्रमाला आपल्या सोबत लहान मुले देखील असताना. मात्र, यंदा कोरोनामुळे मुले येऊ शकली नाहीत. या कोरोना विषाणूने सर्वांना रोखून धरले आहे’.


हेही वाचा – देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार; पंतप्रधानांनी दिले संकेत