घरटेक-वेक...तर बंद होईल तुमचा मोबाईल नंबर; SIM कार्डबाबत सरकारचे नवे नियम

…तर बंद होईल तुमचा मोबाईल नंबर; SIM कार्डबाबत सरकारचे नवे नियम

Subscribe

तुमच्या नावे किती SIM CARD आहेत? किंवा तुमच्या नावावर आत्तापर्यंत किती SIM CARD घेण्यात आले याची माहिती आत्ता तुम्हाला केवळ ३० सेकंदात समजणार आहे. कारण केंद्र सरकारने SIM CARD संदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ज्याबद्दल बहुतेकांना अद्याप कल्पनाच नाही. भारतात आत्ता एक व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त ९ सीमकार्ड घेण्यास परवानगी असेल. यासाठी सरकारने एक नवे पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या नावावर असलेल्या SIM CARD ची माहिती तात्काळ मिळणार आहे.

tafcop.dgtelecom.gov.in असे या वेबसाईटचे नाव आहे. त्यामुळे तुमच्या नावे दुसरं कोणी SIM CARD घेत असेल किंवा त्याचा गैरवापर करत असले तर तुम्हाला त्याची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या वेबसाईटचा वापर करुन तुमच्या नावावर कुणी SIM CARD वापरत नाही याची माहिती तपासू शकता. जर एका आधार कार्डवर नऊपेक्षा जास्त सीमकार्ड असतील तर एसएमएस पाठवला जाईल.

- Advertisement -

एका आधार कार्डवर किती सीमकार्ड घेऊ शकता?

TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, यापूर्वी एका आधारकार्डवर नऊ SIM CARD खरेदी करता येतात. आता एका आधार कार्डवर १८ SIM CARD खरेदी करा येतात. मात्र बिझनेसमुळे ज्या लोकांना जास्त SIM CARD ची गरज आहे अशा ग्राहकांना KYC करण्याची गरज आहे. या KYC साठी केंद्राने ७ डिसेंबरला एक नोटिफिकेशन जारी केले आहे. यात KYC करण्यासाठी ग्राहकांना ६० दिवसांचा वेळ दिला आहे. यात आंतरराष्ट्रीय रोमिंग, आजारी आणि दिव्यांग नागरिकांना ३० दिवसांची अतिरिक्त मुदत दिली जाईल. मात्र KYC न करणाऱ्या ग्राहकांची आउटगोईंस सेवा ५ दिवसांच्या आत तर इनकमिंग सेवा १० दिवसांच्या आत बंद केली जाईल. यानंतर १५ दिवसांत मोबाईल नंबर पूर्णपणे डिस्कनेक्ट केला जाईल.

आधारकार्डवर अॅटिव्हेट SIM CARDचा वापर होत नसेल तरी त्याचा भुर्दंड ग्राहकांना भरावा लागणार आहे. जर तुमच्या ID वरुन रजिस्टर्ड SIM CARD वरुन चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्टी सुरू असतील तर तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच तुमचे SIM CARD बंद होऊ शकते.

- Advertisement -

तुमच्या आधारवर किती सिम कार्ड रजिस्टर्ड असे पाहा?

दूरसंचार नियामक विभागानुसार, टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंज्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) तयार केला आहे. यासाठी tafcop.dgtelecom.gov.in ही वेबसाईट देखील लॉन्च करण्यात आलीय. या पोर्टलवर देशभरातील सर्व मोबाईल क्रमांकाचा डेटाबेस अपलोड केला जाईल. या पोर्टलच्या माध्यमातून स्पॅम आणि फ्रॉड नंबरला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाईल. जर तुमच्या आयडीवरून कोणी दुसरा व्यक्ती SIM CARD वापरत असेल तर ते SIM CARD तुम्ही बंद करु शकता.

१) tafcop.dgtelecom.gov.in वर जा. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Request OTP वर क्लिक करा.

२) आता तुम्हाला ६ अंकी वन टाइम पासवर्ड (OTP) मिळेल. OTP टाका आणि Validate वर क्लिक करा.

३) पुढील पेजवर तुम्हाला आधार क्रमांकावर रजिस्टर्ड सर्व मोबाईल नंबर दिसतील.

४) तुमचा नसलेला किंवा तुम्ही वापरत नसलेला नंबर दिसल्यास, नंबरच्या पुढे एक टिक लावा आणि Report वर क्लिक करा. जर सर्व नंबर तुमचे असतील आणि ते तुम्हाला वापरणे सुरू ठेवायचे असेल, तर काहीही करण्याची गरज नाही.


Omicron Variant : ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या संकटामुळे देशात लसीकरणाचा वेग मंदावला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -