घरताज्या घडामोडीPM Kisan Credit Card बंद झाल्यास पुन्हा कसे सुरू कराल ? जाणून...

PM Kisan Credit Card बंद झाल्यास पुन्हा कसे सुरू कराल ? जाणून घ्या स्टेप्स

Subscribe

किसान क्रेडिट कार्डची वैधता ५ वर्षे देण्यात आली आहे.

सरकारने देशातील ९.५ कोटी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. ज्याचे नाव आहे पीएम किसान क्रेडिट कार्ड योजना (PM Kisan Credit Card) शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या (KKC) माध्यमातून कमी दरात कर्ज देण्यात येते. सर्व बँका आणि वित्तीय संस्थांनी जे शेतकरी कर्ज घेऊ इच्छितात त्यांचा या योजनेत समावेश करुन घेतला. या योजनेच्या अतंर्गत शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड आणि इतर सेवांचा लाभ घेता येतो. योजनेतील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे  किसान क्रेडिट कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र कोणत्यातरी कारणाने क्रेडिट कार्ड हरवले तर ते परत कसे मिळवायचे? क्रेडिट कार्डवर काही व्यवहार झालेत मात्र क्रेडिट कार्ड हरवले किंवा बंद झाल्यास नवीन क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काय करायचे? जाणून घ्या. (How to renew PM Kisan Credit Card? Learn the steps)

आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड (KKC) तयार केले जाते. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुलभ आणि स्वस्त कर्ज उपलब्ध होते. या किसान क्रेडिट कार्डची वैधता ५ वर्षे देण्यात आली आहे. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवायची असल्यासा किंवा बंद झाले कार्ड पुन्हा सुरु करण्यासाठी सोप्या स्टेप्स

- Advertisement -
  • पहिल्यांदा pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
  • तिथे गेल्यावर किसान क्रेडिट कार्ड या पर्यायावर क्लिक करा. तिथून फॉर्म डाऊनोड करा.
  • फॉर्ममध्यो योग्य माहिती भरुन तो फॉर्म तुमच्या जवळच्या बँकेत जमा करा.
  • साधारण: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी हीच पद्धत वापरली जाते.

किसान क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी शेतकरी सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ इंडिया आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) या बँकेत अर्ज करु शकता. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यावर ९ टक्क्यांनी व्याज भरावे लागते. मात्र सरकार त्यावर २ टक्के सबसिडी देते. त्यामुळे ७ टक्क्यांनी व्याज भरावे लागते. शेतकऱ्यांनी जर वेळेच्या आधी कर्ज भरले तर त्यावर ३ टक्क्यांपर्यंत सूट मिळते.


हेही वाचा – Aadhar card प्रिंट बंद केल्याची UIADI ची मोठी घोषणा, आधार कार्डला आता नवा पर्याय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -