घरदेश-विदेशतुम्हीसुद्धा पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता; जाणून घ्या...

तुम्हीसुद्धा पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता; जाणून घ्या…

Subscribe

मोदींच्या वाढदिवसानिमित्त जर का तुम्हालाही त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही सुद्धा मोदींना शुभेच्छा देऊ शकता.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. मोदींचा आज 72 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून आणि संपूर्ण जगभरातूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त जर का तुम्हालाही त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही सुद्धा मोदींना शुभेच्छा देऊ शकता. जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्हालाही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देता येतील.( pm narendra madi birthday)

हे ही वाचा –  ’56 इंच’ थाळी, साडे आठ लाखांचं बक्षीस; मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील हॉटेल मालकाची आगळीवेगळी भेट

- Advertisement -

विविध माध्यमांचा वापर करून करून तुम्ही सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एवढंच करावं लागेल.

1) नमो अ‍ॅपच्या माध्यमातून मोदींना शुभेच्छा देऊ शकता

- Advertisement -

नमो अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही व्हिडीओ रेकॉर्ड करून तुम्ही त्या द्वारे पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. जर का तुम्हाला फोटो पाठवून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तो फोटो तुम्ही अ‍ॅपवर अपलोड करून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

2) तुम्ही तुमच्या कुटुंबासह मोदींना शुभेच्छा देऊ शकता

तुम्हाला जर का तुमच्या कुटुंबासह मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही e – card बनवून त्यात तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश करू शकता. त्याचसोबत त्याखाली तुम्ही मोदींसाठी एखादा मेसेज सुद्धा लिहू शकता. यानंतर ते e – card अपलोड करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही एकापेक्षा अधिक e – card सुद्धा पाठवू शकता.

हे ही वाचा – पंतप्रधान मोदींनी घेतली पुतीन यांची भेट, विद्यार्थ्यांच्या बचावासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले युक्रेनचे आभार

3) याही पद्धतीने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता

‘Gift of Seva’ या नव्या फीचरच्या माध्यमातुन युजर्स संकल्प करू शकतात. त्यात Blood Donation, Leading Digital, TB Mukt Bharat, Swachh Bharat, Vocal for Local to Become Atma Nirbhar, Ek Bharat, LiFE: Pro-Planet People, India Shreshtha Bharat and Catch the Rain यांपैकी कुठल्याही पद्धतीचा संकल्प करू शकतात आणि अशा या आगळ्यावेगळ्या पद्धतीने तुम्ही पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ शकता. नमो अ‍ॅपच्या माध्यमातुन सर्व प्रकारचे संकल्प करता येतात. एवढेच नाही, तर तुम्ही या अ‍ॅपवर 5 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि किसान सेवा यासाठी सुद्धा डोनेशन सुद्धा देऊ शकता.

हे ही वाचा – पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या 1200हून अधिक भेटवस्तूंचा उद्यापासून ई-लिलाव

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -