Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी पंतप्रधान मोदींनी घेतली पुतीन यांची भेट, विद्यार्थ्यांच्या बचावासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले...

पंतप्रधान मोदींनी घेतली पुतीन यांची भेट, विद्यार्थ्यांच्या बचावासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले युक्रेनचे आभार

Subscribe

उझबेकिस्तानमधील समरकंद येथे SCO शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना रशिया भेटीचे निमंत्रणही दिले. दोघांमध्ये द्विपक्षीय बैठकही झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या बचावासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी युक्रेनचे आभार मानले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजही जगासमोरील सर्वात मोठी समस्या, विशेषत: विकसनशील देशांसमोर अन्न सुरक्षा, इंधन सुरक्षा, खते या आहेत, आम्हाला मार्ग शोधावे लागतील. तुम्हीही पुढाकार घ्यावा.

- Advertisement -

जेव्हा आमचे हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. परंतु मी तुमचे आणि युक्रेनचे आभार मानू इच्छितो. कारण तुमच्या मदतीमुळे आणि युक्रेनच्या मदतीने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढू शकलो. सध्या युद्धाचा काळ नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

गेल्या अनेक दशकांपासून आम्ही प्रत्येक क्षणी एकमेकांसोबत आहोत. दोन्ही देश या क्षेत्राच्या भल्यासाठी सातत्याने काम करत आहेत. आज SCO शिखर परिषदेत तुम्ही भारतासाठी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल मी तुमचा आभारी आहे, असं पीएम मोदी म्हणाले.

2001 पासून आमचा प्रवास सुरू

आमचा प्रवास 2001 पासून सुरू आहे. 22 वर्षात आमचे नाते खूप घट्ट झाले आहे आणि ते आणखी घट्ट होणार आहे. आपल्या अतूट नात्याची संपूर्ण जगाला जाणीव आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र काम करावे लागेल, असंही मोदी म्हणाले.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्या हार्दिक शुभेच्छा

पुतिन यांनी पीएम मोदींना उद्या तुमचा वाढदिवस असल्याचे सांगितले. आमच्या रशियन संस्कृतीत वाढदिवसाच्या एकदिवस आधीच शुभेच्छा दिल्या जात नाहीत, असं पुतीन म्हणाले. परंतु मला तुमच्या वाढदिवसाबद्दल माहिती आहे. माझ्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, असं पुतीन म्हणाले.


हेही वाचा : भारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे..,एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -