घरदेश-विदेशदिलासादायक! भारतात कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू!

दिलासादायक! भारतात कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू!

Subscribe

हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी दिली माहिती.

देशात कोरोना विषाणूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, कोरोनावरील औषधं, लस सतत शोधण्याचे काम शास्त्रज्ञांकडून केले जात आहे. यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ही माहिती दिली.

“भारतात तयार करण्यात येणाऱ्या कोरोना लसीची मानवी चाचणी पीजीआय रोहतकमध्ये सुरू करण्यात आली आहे. भारतीय बायोटेक कंपनीने तयार केलेले कोवॅक्सीन या लसीची चाचणी उंदीर आणि ससे या प्राण्यांवर यशस्वीरित्या करण्यात आली आहे.” यानंतर, त्याचा प्रयोग माणसांवर करण्यास सुरूवात झाली आहे.”, असे हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी सांगितले. तर लोकांना देण्यात आलेल्या या लसीचा आतापर्यंत कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. असेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

भारत बायोटेकला त्याच्या अँरो-कोरोना व्हायरस लस कोवॅक्सिनची क्लिनिकल चाचणी सुरू करण्यास देशातील औषध नियामक यांच्याकडून नुकतीच मान्यता मिळाली होती. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सात लसी सध्या देशाच्या विकासाच्या विविध टप्प्यावर आहेत, त्यापैकी दोन लसींना मानवांवर क्लिनिकल चाचणी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

या महिन्याच्या सुरुवातीला Zydus कंपनीला त्यांच्या लसीची मानवी चाचणी करण्यास अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाली आहे, असे Zydus कंपनीकडून सांगण्यात आले होते.

कंपनीने केलेला दावा

दरम्यान, भारत बायोटेक कंपनीचा लस बनवण्याचा दीर्घ अनुभव आहे. पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी, इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर आतापर्यंत कंपनीने लस बनवल्या आहेत. भारत बायोटेक ही हैदराबादमधील फार्मा कंपनी आहे. या कंपनीने कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे कोरोनावरील ही लस फेज-१ आणि फेज-२ या मानवी चाचणीसाठी डीसीजीआयने परवानगी दिली आहे. मानवी चाचणीचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.


खुशखबर! भारतात १५ ऑगस्ट रोजी लाँच होणार कोरोनाची पहिली लस!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -