घरताज्या घडामोडीPhone tapping प्रकरणी मुख्यमंत्री कधी बोलणार ? - फडणवीस

Phone tapping प्रकरणी मुख्यमंत्री कधी बोलणार ? – फडणवीस

Subscribe

पोलिस अधिकाऱ्यांमधील बदल्यांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय गृहसचिवांना केली असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांना भेटल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संपुर्ण बदल्यांच्या संभाषणाच्या प्रकरणात केंद्र सरकारकडून योग्य तपास करण्यात येईल आणि सरकारला अहवाल सादर करण्यात येईल असेही केंद्रीय गृह सचिवांनी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपुर्ण प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच बोलत आहेत. पण या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण गरजेचे असल्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणातील माहिती अतिशय गोपनिय असल्यानेच पोलिसांचे खच्चीकरण होऊ नये म्हणूनच ही माहिती सार्वजनिकरीत्या आणणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी या संपुर्ण प्रकरणात सीआयडी चौकशी करा, असे म्हटले असतानाही या प्रकरणात कोणतीही चौकशी झाली नाही. उलट या प्रकरणातकोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय ? असा सवाल फडणवीस यांनी केला. आयपीएस अधिकाऱ्यांचे प्रकरण हे केंद्राशी संबंधित असल्यानेच केंद्रीय गृह सचिवांना विनंती केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयपीएस अधिकाऱ्यांचा संबंध असल्याने आणि हे आयपीएस अधिकारी केंद्राचे अधिकारी असल्यानेच या प्रकरणात तपास करण्याचा अधिकार हा केंद्राला असल्याचे ते म्हणाले. या संपुर्ण प्रकरणात आवश्यकता पडली तर कोर्टातही जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

पोलिस दलाचे खच्चीकरण टाळावे 

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय हा अत्यंत गोपनीय असल्यानेच तो सार्वजनिक ठिकाणी आणू इच्छित नाही, असे फडणवीस म्हणाले. अशा प्रकारची माहिती सार्वजनिक झाल्यास त्यामुळे पोलिस दलाचे मनोबल खच्चीकरण्यासारखे होईल. त्यामुळेच या प्रकरणात चौकशीअंती कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी त्यांनी केली. तसेच चुकीचे काम करणाऱ्यांसोबत इतर लोक भरडले जाऊ नये म्हणूनच ही माहिती सार्वजनिकरीत्या आणत नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपुर्ण प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनवेळा पत्रकार परिषद घेतली आहे. पण या संपुर्ण प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकदाही बोलले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. म्हणूनच मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणात प्रतिक्रिया येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस दलातील कार्यरत अधिकारी मंत्र्यांच्या विरोधात पुरावे देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिस दलाला या संक्रमणाच्या अवस्थेतून बाहेर आणावे लागले असेही फडणवीस म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -