घरदेश-विदेश'माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मग मी जीव देऊ का'?

‘माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मग मी जीव देऊ का’?

Subscribe

CAA, NRC, NPR च्या मुद्द्यावर देशभरात गदारोळ माजलेला असताना तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

माझ्याकडे जन्माचा दाखलाच नाही, तर मी जीव देऊ का? असा संतप्त सवाल तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केला आहे. रविवारी एका सभेत CAA, NCR आणि NPR या कायद्यांबद्दल ते बोलत होते. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलासाई सुंदराराजन यांच्या भाषणानंतर ते म्हणाले, माझा जन्म माझ्या गावातील घरात झाला. तेव्हाच्या काळी गावात दवाखाना नव्हता, तर जन्माचा दाखला कुठून मिळणार? तेव्हाच्या काळात ‘जन्म नमन’ पद्धत होती, त्यानुसार गावातल्या स्थानिक पंडिताकडे याची नोंद करण्यात येत होती. पण त्यावर कोणताही अधिकृत शिक्का मिळत नव्हता. माझ्याकडे स्वतःच्या जन्माचा दाखला नाही, तर माझ्या वडीलांचा जन्म दाखला कुठून आणणार? कागदपत्रांसाठी मी काय जीव दिला पाहीजे का? असा संतप्त सवाल करत सीएए आणि एनआरसी कायद्याबाबत साशंकता उपस्थित केली आहे.

गरीब लोकं कागदपत्रे कुठून आणणार?

पुढे ते म्हणाले, माझा जन्म झाला तेव्हा आमच्याकडे ५८० एकर जमीन आणि इमारत होती. जर मी माझा जन्म दाखला देऊ शकत नाही, तर दलित, आदिवासी आणि गरीब लोक कागदपत्रे कुठून आणणार? देशात एवढा गोंधळ का करुन ठेवला आहे? ६६ वर्षीय चंद्रशेखर राव यांचा जन्म १९५४ साली मेडक जिल्ह्यातील सिद्दिपेट जवळच्या चिंतामडाका या गावी झाला. पुढे ते म्हणतात, नवीन कायदा हा भारतीय घटनेच्या मूलभूत तत्त्वाचा अनादर करीत आहे. जो धर्म, जाती किंवा पंथांच्या समानतेची हमी देतो. संपूर्ण जग देशाकडे पाहत आहे आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतातल्या घडामोडींवरील चर्चा देशाला बदनाम करीत आहेत.

- Advertisement -

सीएएविरोधात ठराव

सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध दर्शवित राज्य मंत्रिमंडळाने १६ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारला सीएए रद्द करण्याची विनंती केली होती. अधिवेशनात सविस्तर चर्चा होईल आणि सीएएविरोधात ठराव मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सभागृहाला दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -