घरदेश-विदेशICSE Board Exam: ICSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

ICSE Board Exam: ICSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

Subscribe

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात न घालता कित्येक परिक्षा आतापर्यंत रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. CBSE दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता ICSE बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत बारावीची परीक्षा अद्याप रद्द करण्यात आली नसून त्यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

असे सांगितले असे ICSE बोर्डाने…

देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स बोर्डाने अखेर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सीबीएसईकडून ४ मे ते ७ जून या कालावधीत दहावीची, ४ मे ते १४ जून या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असल्याचे सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -