घरदेश-विदेशऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली होत असेलेली बेकायदेशीर सट्टेबाजी बंद होणार!

ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली होत असेलेली बेकायदेशीर सट्टेबाजी बंद होणार!

Subscribe

ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली होत असेलेली बेकायदेशीर सट्टेबाजी बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने यासंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे

नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली होत असेलेली बेकायदेशीर सट्टेबाजी बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने यासंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व मीडिया प्लॅटफॉर्मला संबंधित जाहिराती न दाखवण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. (Illegal betting in the name of online gaming to be stopped )

आजपासून (शुक्रवार) सट्टेबाजी बंद करण्यात आली आहे. ऑनलाईन खेळात बेटिंग करणे आता बेकायदेशीर मानले जाणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर म्हणाले, जे ऑनलाईन गेम जुगार, सट्टेबाजीला प्रोत्साहन देत असतील किंवा त्यावरून वापरकर्त्यांचे नुकसान होणार असेल आणि ज्यामुळे व्यसनाधीनता वाढत असेल, यापैकी एकही घटक आढळून आला तर ते अॅप भारतात बंद केले जाणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, नियमात अशी तरतूद करण्यात आली आहे की गेममध्ये ऑनलाईन सट्टेबाजी किंवा सट्टेबाजीचा कोणताही प्रकार असेल, तर तो गेम भारतामध्ये बंद केला जाईल. कोणत्याही अटीवर अशा अॅपला परवानगी दिली जाणार नाही. याबाबत सरकारने संबंधितांशी चर्चा केली असल्याचेही चंद्रशेखर यांनी सांगितले.
यामुळे ड्रीम इलेव्हन, रमी अॅप, माय सर्कल ११, या सारखे अॅप बंद होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -