घरदेश-विदेशpakistan tribute lata mangeshkar : 'जगाने एक महान गायक गमावला' लतादीदींच्या...

pakistan tribute lata mangeshkar : ‘जगाने एक महान गायक गमावला’ लतादीदींच्या निधनामुळे पाकिस्तान हळहळला

Subscribe

पाकिस्तानी चाहत्यांनी व्यक्त केला शोक

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर गेली अनेक दिवस कोरोना आणि न्यूमोनिया संसर्गामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या मात्र काल उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या निधनाबद्दल केवळ भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानातूनही हळहळ व्यक्त होतेय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे.

इम्रान खान म्हणाले की, “लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय उपखंडाने एक महान जगप्रसिद्ध गायिका गमावली आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील अनेक लोकांना आनंद मिळाला”, असे ट्वीट केले होते.

- Advertisement -

मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विटरवर वाहिली श्रद्धांजली

पाकिस्तान मंत्रिमंडळातील मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहली आहे. ‘लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीताचा एक युग संपले. लता मंगेशकर यांनी संगीत विश्वावर अनेक दशके राज्य केले. लतादीदी सुरांच्या राणी होत्या. संगीत विश्वात त्यांच्यासारखे कोणीच नव्हते. त्यांचा आवाज येणाऱ्या काळातही नागरिकांच्या हृदयावर अधिराज्य करत राहणार, असे मंत्री फवाद यांनी म्हटले.

- Advertisement -

पाकचे विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनीही अर्पण केली श्रद्धांजली

पाकचे विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत जगताने आपल्या सुरेल आवाजाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिकेला गमावले. माझ्या पिढीतील लोक त्यांची सुमधूर गाणी ऐकत मोठे झाले आहेत. ही गाणी नेहमी आमच्या स्मरणात राहतील. लतादीदींच्या आत्म्याला शांती लाभो’, असं ट्विट शाहबाज शरीफ यांनी केले आहे.

पाकिस्तानी चाहत्यांनी व्यक्त केला शोक

पाकिस्तान चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले आहेत. पाकिस्तानी चाहता शकील अहमदने लिहिले की, ‘महानायक लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. ईश्वर त्यांना पुढील जगात शांती देवो. शांतीची आशा… प्रेम.. भारत…’.

पाकिस्तानी पत्रकार आमिर रझा खानने लता मंगेशकर यांचे बालपणीचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, ‘हृदयद्रावक, कोणाला माहित होते की, ही छोटी मुलगी संगीत जगताची राणी बनेल. लताजी तुम्ही आमच्या काळातील खरे महान व्यक्तिमत्व आहात. RIP … तुम्ही भारत, पाकिस्तान आणि जगभरातील संगीतप्रेमींची राणी आहात.’


India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 22 टक्क्यांनी घटली, आज 83 हजार 876 नवे रुग्ण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -