घरCORONA UPDATEIndia Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 22 टक्क्यांनी घटली, आज 83...

India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 22 टक्क्यांनी घटली, आज 83 हजार 876 नवे रुग्ण

Subscribe

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दैनंदिन रुग्णसंख्याही मोठ्याप्रमाणात कमी होतेय. गेल्या 24 तासात देशात 83,876 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्येत 22 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांपासून देशात 1.07 लाखदरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहे. दिलासाजनक बाब म्हणजे देशातील कोरोना मृतांची संख्याही कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासात 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा आता 5 लाख 02 हजार 874 झाला आहे.

- Advertisement -

दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी घट पाहता देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत ही संख्या 11 लाख 08 हजार 938 झाली आहे. याचदरम्यान आज सक्रिय रुग्णसंख्या 1,16,073 ने कमी झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 99 हजार 054 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 4 कोटी 06 लाख 60 हजार 202 झाली आहे.

देशात कोरोना रिकव्हरी रेटही मोठ्याप्रमाणात वाढतोय. आत्ता देशातील कोरोना रिकव्हरी रेट हा 96.19 टक्के इतका आहे. तर देशातील डेली पॉझिटिव्हीटी रेट हा 7.25 टक्के झाला आहे. तर वीकली पॉझिटिव्हीटी रेट हा 9.18 टक्के झाला आहे. याशिवाय देशात आत्तापर्यंत 1,69,63,80,755 लसीकरण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -