घरताज्या घडामोडीLive Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची सरी

Live Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची सरी

Subscribe

राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.


ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपली

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचल्या.


विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी १२ खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा राज्यसभेत उपस्थिती केल्याने पुन्हा राज्यसभेचे कामाकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. यापूर्वी १२ वाजेपर्यंत राज्यसभेचे कामाकाज स्थगित करण्यात आले होते.

- Advertisement -


राज्यसभेनंतर लोकसभाही आता विरोधकांच्या गोंधळामुळे १२ वाजतेपर्यंत स्थगित केली आहे.


आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आजही विरोधक १२ निलंबित खासदारांच्या मुद्द्यांवरून आक्रमक झाले आहेत. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख चौकशीसाठी चांदीवाला आयोग कार्यालयात दाखल झाले.


भीमा कोरेगावर एल्गार परिषद प्रकरणी सुधा भारद्वाज यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुधा भारद्वाज यांचा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून ८ आरोपींचा जामीन नामंजूर केला आहे.


देशात गेल्या २४ तासांत ८ हजार ९५४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २६७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १० हजार २०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ९९ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात १२४ कोटी १० लाख ८६ हजार ८५० लसीचे डोस दिले गेले आहेत.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची आज पुन्हा चांदीवली आयोगासमोर होणार चौकशी


मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज दुपारी ३ वाजता भेटणार आहेत.


औरंगाबाद शहरात पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पांड्ये यांनी दिली आहे. पण आजपासून औरंगाबादच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.


आजपासून हार्बर मार्गावर १२ डब्यांची एसी लोकल धावणार आहे. सीएसएमटी ते अंधेरी दरम्यान धावणाऱ्या ४४ सेवा आजपासून गोरेगावपर्यंत धावणार आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -